अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीकडून डॉ. श्रीनिवास पोतदार यांचा सत्कार व सन्मान
अकोले / लोकवेध live न्यूज
आजी माजी शिक्षक भवन अकोले येथे जिल्हा परिषद टाकळी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील पदवीधर शिक्षक डॉ. श्रीनिवास विजय पोतदार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मानद पीएच.डी. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीकडून सत्कार व सन्मान करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी व शिक्षक मित्र उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.बाळासाहेब आरोटे, केंद्रप्रमुख कुंभेफळ हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक मा. श्री.अण्णासाहेब आभाळे उपस्थित होते. याशिवाय सत्कार सोहळ्याला मा. श्री. राजेंद्र सदगीर, सुभाष बगनर, गोरख देशमुख, गणपत सहाणे, बाळासाहेब बांबळे, भाऊसाहेब हासे, संजय शिंदे, प्रतिक नेटके, बाळासाहेब भांगरे, हरिबा चौधरी, नरेंद्र राठोड, चंद्रभान मेंगाळ, अशोक पथवे, रमेश शिंदे, लांडगे सर, निवृत्ती सुपे व मोठ्या संख्येने अकोले तालुका शिक्षक मित्रपरिवार उपस्थित होता. सत्कार सोहळ्यात डाॅ.पोतदार यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल अण्णासाहेब आभाळे, सुभाष बगनर, गोरख देशमुख व केंद्रप्रमुख श्री. बाळासाहेब आरोटे यांनी मनोगत व्यक्त केले.वक्त्यांनी आपल्या भाषणात डॉ. पोतदार यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल गौरवोद्गार काढले. अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी व उपस्थित शिक्षक मित्र परिवाराने डॉ.पोतदार यांच्या यशामुळे प्राथमिक शिक्षण विभागाचा सन्मान वाढल्याची भावना व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी सर्वांचे आभार मानले तसेच ब्रिटिशकालीन नाशिक जिल्ह्याचे प्रशासन एक अभ्यास १८६९ ते १९४७ या विद्यावाचस्पती संशोधन विषयाची अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. श्री.गणपत सहाणे सरांनी सर्वांचे आभार मानले.
