श्रीमती वंदना सोनार पोतदार यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
–लोकवेध live न्यूज इगतपुरी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी, केंद्र काळुस्ते, बीट घोटी, ता. इगतपुरी येथे कार्यरत उपक्रमशील शिक्षिका श्रीमती वंदना एकनाथ सोनार पोतदार यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२४ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच आय. एम. ए. सभागृह शालिमार, नाशिक येथे मा. श्री. राजाराम पानगव्हाणे पाटील ( अध्यक्ष नाशिक ग्रामीण शिक्षण मंडळ ), मा. श्री. भरत गरुड ( मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई शहर ), मा. श्री. बापुसाहेब पाटील ( शिक्षणाधिकारी महानगरपालिका नाशिक ), प्राचार्य डॉ. अमृता राव ( के.के. वाघ युनिव्हर्सल स्कुल नाशिक ), यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. अनिल निरभवणे, सचिव नाना उलारे, सल्लागार यु. के. अहिरे, अनिल शिरसाठ, सुनिल आरणे, रावसाहेब पगार, डॉ. श्रीनिवास पोतदार उपस्थित होते. श्रीमती वंदना सोनार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अतिदुर्गम भागातील दरेवाडी येथील पत्र्याच्या शेडमधील शाळेतून गुणवत्तापूर्ण ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे करीत आहेत. तसेच त्यांनी तळोघ, काळुस्ते या पेसा क्षेत्रांतील शाळांमधुनही विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार भविष्यवेधी शिक्षणाची रूजवणूक केली आहे. त्यांना मिळालेल्या या राज्य आदर्श पुरस्काराबद्दल इगतपुरी तालुका गटशिक्षणाधिकारी मा. श्री. निलेश पाटील, विस्तार अधिकारी मा. श्री. किशोर सोनवणे, केंद्रप्रमुख मा. श्री. विजय पगारे तसेच काळुस्ते केंद्रातील सर्व शिक्षक, इगतपुरी तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आप्तेष्ट व शिक्षक मित्र परिवाराकडून श्रीमती सोनार यांचे अभिनंदन होत आहे.
