गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थेअंतर्गत जोर्वेत आरोग्य शिबीर संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
गॉड्स असेंबल मिनिस्ट्री या संस्थेअंतर्गत जोर्वे या गावात हेल्थ एज्युकेशन कॅम्प घेण्यात आला, यावेळी संस्थेच्या अध्यक्षा उज्वला ताई जगताप यांनी आपल मत मांडलं हेल्थ एज्युकेशन कॅम्प घेणं गरजेचं आहे, सद्या वाढते साथीचे आजार तसेच बदलते हवामान पाहता आपले आरोग्य जपले पाहिजे यासाठी आरोग्य शिक्षण शिबीर घेत आहोत. या वेळी माजी आमदार पी जी रोहम यांच्या कुटुंबातील राजकीय आणि सामाजिक वारसा असलेले तरुण व्यक्तिमत्व मा ऋतिक रोहम सर उपस्थित होते त्यांनी मुलांशी संवाद केला, तुम्हाला डॉक्टर दवाखाना आवडतो का? मुलं म्हटले नाही… तर मग अशी वेळ येऊ नये म्हणून आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे, आरोग्य सेविका प्रिती ताई चव्हाण यांनी आपण आपली स्वच्छता कशी करायला हवी यावर सविस्तर पणे माहिती दिली, हात धुण्याच्या पद्धती प्रात्यक्षिक करून दाखवली व मुलाकडून करून घेतली, स्वच्छता आणि सतर्कता अनेक आजार टाळून आनंदी जीवन देऊ शकते.
कनोली गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले मच्छिन्द्र जगताप सर यांनी आरोग्य अधिक चांगले राहावे यासाठी आपल्या आहारात विषमुक्त फळ भाज्या असणे आवश्यक आहे. यासाठी आपण प्रेत्येकाने आपापल्या घरी गरजेपुरता फळ व भाज्याची लागवड करायला हवी, परसबाग करणं किती सोपं आहे हे समझवलं. आपल्या दररोजच्या आहारातील भाजीपाला आपल्याच परसबागेतून मिळाला तर आपली आर्थिक बचत मोठ्या प्रमाणावर होईल आणि जास्त करू शकलो तर त्याची विक्री करून कुटुंबाला अर्थ सहाय्य मिळेल. परसबागेतील विषमुक्त भाजीपाला आहारात असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढेल कुटुंब सदृढ व सक्षम होऊ शकेल आणि म्हणून गॉड्स असेंबल संस्थेद्वारे उपस्थित सर्वांना परसबाग साठी बियाणं देण्यात आली. रोहम सरांनी गावच्या वतीने संस्थेच्या या उपक्रमा बद्दल आभार मानली. शेवटी मुले आनंदाने बोलली “आम्ही परसबाग करू घरी, बियाणं लावू मोकळ्या जागी, स्वतः जे पिकवू तेच खाऊ आणि आनंदाने राहू. “
