राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणार -आ खताळ

देवगडच्या खंडोबा महाराजांची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते माहाआरती

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुका गेली ४० वर्षापासून वनवासात होता तो वनवास आता संपला आहे. आता आपण राजकारण बाजूला ठेवून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रलंबित असणाऱ्या समस्या आणि अडी अडचणी राजकारण बाजूला ठेवून सोडवू असा विश्वास संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिला
संगमनेर तालुक्यातील प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसाच्या देवगड देवस्थान खंडोबा महाराजांची महा आरती संगमनेरचे नूतन आमदार अमोल खताळ पा आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ निलम खताळ यांच्या शुभहस्ते झाली या वेळी देवगड देवस्थान ट्रस्ट वतीनेआमदार अमोल खताळ यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला यावेळी देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे , उपाध्यक्ष यादव पावसे ,सचिव मोठ्याभाऊ बडे विश्वस्त काशिनाथ पावसे ,उत्तम जाधव चंद्रशेखर गडाख ,सरपंच सुभाष गडाख उपसरपंच सुजाता दवंगे भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे भाजप युवा मोर्चा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे अल्पसंख्यांकचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भालेराव यांच्यासह परिसरातील खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार खताळ पाटील म्हणाले की ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान प्रत्येक गावात वाडीवस्ती वर घराघरात जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या त्याचप्रमाणे मुंबई मधील आमदारकीचा शपथविधी झाल्यानंतर पुन्हा प्रत्येक गावात वाडीवस्तीवर घरो घरी जाऊन प्रत्येकाचे ऋण व्यक्त करणार आहे अन संगमनेर तालुक्याचा गेली ४० वर्षापासून जो विकास खुंटला आहे तो विकास आपण राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक पद्धतीने करू असा ही आ खताळ यांनी विश्वास व्यक्त केला
संगमनेर तालुक्यातील असा कोणता गाव नाही की त्या गावाने आपल्याला मतदान दिले नाही प्रत्येक गावाने आप ल्याला भरभरून मतदान दिले आहे त्या मुळे आपल्याला ज्यांनी मतदान दिले त्यांच्यासाठी काम करायचे आहे आणि ज्यांनी मतदान दिले नाही त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी आज सर्वत्र परिचित झालो आहे त्यामुळे तुमचे सर्व मायबाप जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला

शनिशिंगणापूर येथे शनि अमावस्येच्या निमित्ताने शनि महाराजांची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले आहे आता देवगड येथील खंडोबा महाराजांचे सुद्धा आशीर्वाद घेतले आहे आणि आता शिर्डी च्या साईबाबांचे मनोभावे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे

आमदार अमोल खताळ
संगमनेर विधानसभा मतदार संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!