अखेर आ खताळ यांच्या माध्यमातून तळेगावकरांचा पाणी प्रश्न सुटला

गायत्री प्रोजेक्टचा तलाव आजपासून पिण्याच्या पाण्यासाठी खुला

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेगाव भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार अस ल्याबाबतचा विश्वास शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक प्रचार दर म्यान तळेगावकरांना दिला होतात्यानुसार संगमनेर विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कामाचा श्री गणेशा तळेगाव शिवारातील भागवतवाडी येथील गायत्री प्रोजेक्ट कंपनीचा तलाव तळेगावकरांसाठी खुला करून देत केला आहे त्यामुळे या गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील भागवतवाडी येथे गायत्री प्रोजेक्ट कंपनीचा तलाव निळवंडे डाव्या कालव्याच्या पाझराचे पाणी जमा झाले आहे सद्यस्थितीला या तलावात ४० ते ५०हजार कोटी लिटर पाणी आहे हे पाणी तळेगावकरांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी तळेगावचे सरपंच मयूर दिघे यांनी शिवसेनेचे नूतन आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती त्यानुसार आ खताळ यांनी समक्ष त्या प्रोजेक्टवर जाऊन अधिकाऱ्यांसमवेत त्या तलावाची पाहणी केली या प्रोजेक्टच्या तळ्यातील पाणी तळेगावकरांना देण्यात यावी अशी विनंती आमदार खताळ यांनी शेतकरी सोमनाथ दिघे व गोरख दिघे यांना केली त्यानंतर तळेगावकरांचा पाणी प्रश्न गंभीर आहे याची आम्हाला जाण आहे त्यामुळे या प्रोजेक्टच्या तलावातील पाणी देण्यास आमची कुठलीही हरकत नाही असे आ खताळ यांच्या समक्ष सांगितले त्यानंतर या कामाचा श्री गणेशा आ खताळ यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला। त्या नंतर तलावातील पाणी तळेगावकरांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोमनाथदिघे व गोरख दिघे व गायत्री प्रोजेक्ट कंपनीचे मॅनेजर सुधीर शेळके यांचा आ खताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी तहसीलदार धीरज मांजरे गट विकास अधिकारी अनिल नागणे जीवन प्राधिकर याचे कार्यकारी रवींद्र महाजन उपअभियंता थिटे शैलजा उपअभियंता श्रीरंग गडदे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहायक प्रमोद राहणे तळेगावचे सरपंच मयूर दिघे भाजप नेते अमोल दिघे शिवसेनेचेतालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे गणेश दिघे,आर पी दिघे माजी सरपंच तात्याभाऊ दिघे राव साहेब दिघे, रामदास दिघे, उत्तम दिघे निलेश दिघे रामदास दिघे दत्तात्रय दिघे रोहित शिंदे या सरपंच तात्यासाहेब दिघे श्रावण कांदळकर यांच्यासह तळेगाव व भागवत वाडी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे भागवत वाडी शिवारातील गायत्री प्रोजेक्ट कंपनीच्या तळ्यामध्ये पाणी साचलेले आहे ते पाणी तळेगाव करांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती या प्रोजेक्टसाठी जमीन देणारे सोमनाथ दिघे व गोरक्ष दिघे यांना विनंती केली होती त्या दोन्ही शेतकर्यांनीआमच्या विनंतीचा मान ठेवून हे पाणी देण्यास संमती दर्शवली आहे त्यामुळे मी तळेगाव करांना दिलेला शब्द सोडविण्यास आपण सुरुवात केली आहे
आमदार अमोल खताळ
महायुती संगमनेर विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!