अखेर हिंदुत्वाच्या सत्याचा विजय झाला- गायकर
संगमनेरचे नूतन आमदार अमोल खताळ यांचा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गौरव
संगमनेर / लोकवेध live न्यूज
आपले संपूर्ण आयुष्य हिंदुत्वासाठी वेचले आणि आलेले प्रत्येक संकट स्वतः च्या अंगावर घेतली अशा या सर्वसामान्य छत्रपतीच्या मावळ्याने हुकूमशाहीने पद्ध तीने चाललेली चाळीस वर्षाची सत्ता उल थवून टाकलीआणि यातूनच हिंदुत्वाच्या खऱ्या सत्याचा विजय झाला असल्याचे रोखठोक मत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे केंद्रीय महामंत्री तसेच राष्ट्रीय प्रवक्ता शंकर गायकर यांनी व्यक्त केले
संगमनेर येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या बैठकीसाठी बजरंग दलाचेकेंद्रीय महामंत्री व राष्ट्रीय प्रवक्ता शंकर गायकर आले होते. त्यांनी महायुतीचे नूतन आ अमोल खताळ पाटील यांच्या निवास स्थानी भेट दिली त्या प्रसंगी बोलताना गायकर म्हणाले की संगमनेर विधानसभा मतदार संघात गेली चाळीस वर्षापासून परंपरा असलेली स्वतःची मक्ते दारी समजून हुकूमशाही पद्धतीने राज्य केले त्यांची सत्ता उलथून टाकत या अश्रू शक्तीला पाडण्याचे काम खर्याअर्थाने नूतन आमदार अमोलखताळ यांनी केले आहे खताळ यांनी त्यांना नुसतेपाडण्याचे काम केले नाही तर आजपर्यंत खरे सत्य लपविण्याचे काम ज्या बलाढ्य शक्तिने केले त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम या छत्रपती च्या मावळ्याने केले असल्याचे प्रखड मत त्यांनी व्यक्त केले यावेळी केंद्रीय महामंत्री शंकर गायकर यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ यांच्यासह त्यांचे वडील धोंडीबा खताळ आई मंगल खताळ पत्नी नीलिमा खताळ यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत बेल्हेकर उत्तर नगर जिल्हामंत्री विशाल वाकचौरे, विभाग संयोजक सचिन कान काटे, बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक, बजरंग दल संयोजक कुलदीप ठाकूर, प्रदीप भाटे, गणेश बंगाळ, योगेश काजळे आदींसह विश्व हिंदू परिषद, बज रंग दल, मातृशक्ती- दुर्गावाहिनी पदाधि कारी उपस्थित होते.
