संगमनेर शहर व तालुक्यातील प्रशासकीय व निमशासकीय ऑफीस मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावावी
सहा डिसेंबर मध्ये पर्यंत शासकीयऑफिसमध्ये बाबासाहेबांचा फोटो नसल्यास त्या ऑफिस समोर उपोषण करणार – दलित पॅंथर
संगमनेर / लोकवेध live न्यूज
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संगमनेर, जि. अहिल्यानगर येथील शहर व तालुक्यातील प्रशासकीय व निमशासकीय ऑफीस मध्ये प्रतिमा दिसत नाही असे आढळल्यास प्रशासकीय ऑफिस समोर उपोषण केले जाईल असा इशारा दलित पॅंथरच्या वतीने देण्यात आला आहे असे निवेदन संगमनेर प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांना देण्यात आले
यावेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय दलित पॅंथर चे शहराध्यक्ष राजू यादव खरात दलित पॅंथर चे जिल्हाध्यक्ष काकासाहेब सुखदेव गायकवाड प्रवीण देवेंद्र गायकवाड रवींद्र अरुण गिरी सुनील देवराम जाधव संदीप भाऊसाहेब दळवी बाळासाहेब माधव जाधव धनंजय जगनाथ साळवे उत्तम टपले निलेश रोहम कैलास जाधव सुनील रोकडे श्रीकांत बागुल राहुल बागुल विजय खरात सुभाष भालेराव नारायण मरभळ संजय बागुल उत्तम भालेराव दिलावर सय्यद प्रशांत घेगडमल रोहम अभंग संकेत कानकाटे विजय पांढरे शोहेब रंगरेज निलेश दुसरे सुनील रोकडे रवी दिवे अमोल बागुल अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यादी निवेदनात म्हटले आहे की
आपणांस विनंतीपुर्वक अर्ज करतो की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना प्रदान केली. त्यामुळे आज आपला भारत देश समानतेकडे वळाला आहे. परंतु काही प्रशासकीय ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आलेली नाही. परंतु शासनाने वारंवार जी. आर. काढून प्रतिमा लावण्याचा आदेश सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयास दिलेला आहे. परंतु काही शासकीय व निमशासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आढळून येत नाही.
तरी मे. साहेब आपणांस विनंती करण्यात येते की, दि.३०/११/२०२४ रोजी पासुन ते ६ डिसेंबर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन) या दिवसाच्या आतमध्ये लावण्यात यावी. असे न केल्यास ज्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आढळून येणार नाही त्या कार्यालयास कुठलीही सुचना न देता त्या कार्यालयातील अधिका-याच्या ऑफीस समोर तिव्र स्वरुपात उग्र आंदोलन केले जाईल. तरी होणा-या परिणामांची सर्व जबाबदारी शासन व प्रशासन यांचेवर राहील कृपया याची नोंद घ्यावी.
