महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिना निमित्त गॉड्स असेम्बल मिनिस्ट्री, संस्थेच्या वतीने फॅमिली कॉन्फरन्स चे आयोजन

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

06 डिसेंबर 24, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनाचे अवचित्त साधून गॉड्स असेम्बल मिनिस्ट्री, कनोली या संस्थे ने फॅमिली कॉन्फरन्स चे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते मा श्री इमॅन्युअल मुरमुड व मा प्रितीताई मुरमुड यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा मा उज्वलाताई जगताप, मा मच्छिन्द्र जगताप सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
मा इमॅन्युअल सर यांनी पती व पत्नी यांना मार्गदर्शन करताना म्हटले की पत्नी ने आपापल्या पतीच्या अधीन असावे व पतीने जसे स्वतःवर तसे आपल्या पत्नीवर प्रेम करावे. जे काही आपण करू ते पूर्ण हृदयाने, पूर्ण मनाने व पूर्ण शक्तीने श्रद्धा पूर्वक केले पाहिजे.
पतीचा गुणधर्म दानशूरपणा असतो तर पत्नी कंजूस असते. हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा परिवार बनतो. दान करण चांगल आहे पण नको तिथे अति दान हे मात्र धोकेदायक आहे, त्याने खूपदा पुरुष अडचणीत येतात. परिवाराची गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी पतीची आहे तर परिवाराची देखभाल करण्याची जबाबदारी पत्नीची आहे. पत्नी कंजूस असते म्हणून तर परिवारात जे काही वाचलेले आहे ते पत्नीच्या बचतीमुळे आणि म्हणून कुटुंबात दोघांचे स्थान महत्वाचे आहे. पत्नीनी पती च्या अधीन असा म्हणजे पत्नीना कण्ट्रोल करायला नाही सांगत तर स्वतः प्रमाणे तिचा आदर करायला हवा, कारण हर एक परिवार स्त्री मुळे सुरक्षित आहे. स्त्रीयांना ध्यान आवडते तर पुरुषांना सन्मान आवडतो, आणि जगात पतीला सर्वोत्कृष्ट सन्मान फक्त त्यांची पत्नीचं देऊ शकते, आणि पत्नीला सर्वात जास्त ध्यान फक्त तिचा पती च देऊ शकतो. पती पत्नी मिळून कुटुंब बनते आणि जर त्यांच्यात वाद असतील तर त्याच्या वादामुळे सर्वात जास्त त्रास मुलांना होतो. सामाज्यात आपली मुले हे आपली प्रतिमा असतात आणि म्हणून एक कुटुंब चांगले राहिले तर एक चांगला समाज आपण घडवू शकतो.
आपल्याला आपल्या कुटुंबात प्रेमाने वागण्याची नशा चढली पाहिजे. प्रेम च सर्व दुःखाचे उत्तर आहे, आपली पती आणि पत्नी आपल्या मना विरुद्ध जरी असेल तरी तिच्यावर मनापासून प्रेम करून बघा, आपल्या जोडीदाराला न समजून घेता प्रेम करा, प्रेमात कोण चूक कोण बरोबर काही दिसत नाही तर प्रेमानेच मने जिंकून घेता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!