शोषित,वंचित,दुर्लक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारी चणेगावची जोडगोळी
लोकवेध live न्यूज
प्रत्येक क्षेत्राचं एक डायनॅमिक्स असतं म्हणजे ते गतिशील, कार्यप्रवण आव्हानात्मक असते, त्यातील समस्या सहजगत्या सोडवता येतात,आणि ते क्षेत्र ऊर्जितावस्थेला आणता येतं.
आपल्या जीवनात खूप कमी वयात अनुभवाच्या प्रयोग शाळेत ज्यांच्या बुद्धीला विचारांचे पैलू पडले,समाजातील शोषित वंचित उपेक्षित दुर्लक्षित घटकांना ‘माणूस’म्हणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियमित धडपड करत असलेली संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील हरहुन्नरी जोडगोळी म्हणजे राजकीय कार्यकर्ते राजेंद्र भाऊसाहेब खेमनर पा.तसेच सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर केरु भोसले पा.आज या दोन व्यक्तीमत्वाचा एकत्रित वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते मा.बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र खेमनर हे आपल्या आश्वी गणात आणि गटात नियमित सक्रीय असुन सर्वसामान्यांच्या सुख दुःखात ते नेहमी सहभागी असतात.अनेकांच्या अडीअडचणीला,मदतीला सदैव तत्पर असलेले राजेंद्र खेमनर म्हणजे सर्वसामान्यांचा आधारस्तंभच,तर रामेश्वर भोसले हे महाराष्ट्र युवा मोर्चापासून परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय झाले प्रथमतःते पुणे येथे लाखोंच्या गर्दीत भरलेल्या बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला आले असता दरम्यान येथेच त्यांचे मन परिवर्तन झाले.मुलनिवासी महापुरुषांच्या विचारांनी त्यांच्या मनावर गारूड केले,आणि तेच गारुड आजही त्यांच्या मनावर आरुढ आहे.महापुरुषांच्या विचाराशिवाय समाज प्रबोधन अशक्य,जगाच्या सर्व समाजातील प्रत्येक स्तरातील कणाकणातील दुःखाचे मुळ हे अज्ञानच आहे ह्या तथागतांच्या महाशोधाचा त्यांना वेळोवेळी प्रत्यय येऊ लागला,तेथुनच पुढे सुरू झालेला त्यांचा वैचारिक प्रवास आजतागायत न थांबणारा ठरला,तेव्हा बाबासाहेब मोकळ आप्पासाहेब गायकवाड ज्ञानेश्वर यादव,दिपक तपासे पत्रकार महेश भोसले कर्तव्य मराठा विवाह संस्थेचे संदिप शेळकेसह संगमनेरातील अनेक कार्यकर्ते पुण्याच्या कार्यक्रमात दाखल झाले होते.मानवमुद्रा सामाजिक विकास संस्थेचे आधारस्तंभ असलेले रामेश्वर भोसले म्हणजे आज सर्वसामान्यांचा आश्वासक चेहरा झाले.राज्याच्या चळवळीतील अनेक मोठ,मोठ्या कार्यकर्त्यांशी,नेत्यांशी ते आज संधान बांधून आहे.महामानव फौउंडेशनचे अध्यक्ष सिमोन जगताप,भावराव पा.लोहाळे, प्रगतशील शेतकरी कॉ.कानिफनाथ तांबे,बाळासाहेब पाळंदे इंजि.अजित ब्राम्हणे,दिपक घोगरे आदी अनेक मान्यवरांचे त्यांना सानिध्य आहे.
समाजाला काहीतरी द्यावं ही उर्मी या जोडगोळीच्या मनात बालपणापासून होती कधी,कधी असे वाटते की इतक्या कमी वयात ही अनुभूती अशक्य पण चणेगाव पंचक्रोशीसह तालुका आणि जिल्ह्यात व्यवस्थेत गतिमान राहण्यासाठी त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो,त्यात लोकशाही मार्गाने प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढणे म्हणजे आव्हानात्मक बाब,पण या सर्वांना चॅलेंज देत राजेंद्र खेमनर, रामेश्वर भोसले यांनी मानवशक्तीला जागृत करताना चणेगाव पंचक्रोशीसह तालुका जिल्ह्यातील युवक वर्ग आपल्याशी जोडला आहे.
राजेंद्र खेमनर हे अल्पावधीतच राजकीय क्षेत्रात वेगवान झाले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नियमितच्या सानिध्यात त्यांना थोरात साहेबांचे व्यक्तीमत्व भावले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला २०१४ साली चणेगावातील जनतेच्या आग्रहास्तव त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविली.जनता मायबापांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देत आपली भावना मतपेटीतून दर्शविली.बघता बघता ते ग्रामपंचायत सदस्य झाले,त्यात काही कालावधीतच त्यांनी आपला पुढचा विजय खेचून आणला आणि ते उपसरपंच पदावर विराजमान झाले.या काळात त्यांनी चणेगावसाठी खूप जोमाने कामाला सुरुवात केली.गावातील सर्व लोकांना शासनाच्या सर्व सोयी सुविधा आणि योजना प्राप्त व्हाव्यात असा त्यांचा व्होरा आहे.दिव्यांग बांधवांना सर्वोतोपरी मदतीसाठी ते आग्रही आहेत.
शासन दरबारी देखील अनेक अडीअडचणीला सामोरे जात त्यांनी पाठपुरावा केला.राजेंद्र खेमनर हा तरुण विकासाची गंगोत्री गावात आणू शकतो असा विश्वास चणेगावकरांना वाटतो!म्हणूनच २०२० मध्ये पुन्हा एकदा जनता मायबापांनी त्यांच्या पदरात भरभरून दान टाकले,म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.भाग्यश्री राजेंद्र खेमनर यांना चणेगावच्या सरपंदी विराजमान केले.अशा वेळी खऱ्या अर्थाने राजेंद्र खेमनर यांनी सावित्री ज्योतीचा वैचारिक वारसा जपलाय.सावित्रीच्या लेकींनी आज अनेक क्षेत्रातील प्रस्थापितांची मक्तेदारी उखडून, जिर्ण रुढीच्या चिरफळ्या केल्या आहेत. आज गावात जवळपास ५ कोटीची विकास कामे झाली आहेत आणि अनेक नवीन कामाला सुरुवात होणार आहे. त्यात गावातील प्रत्येक परिवाराला सर्वथैव सुविधा मिळणार आहे.तर रामेश्वर भोसले आपली नोकरी सांभाळून समाजात सक्रीय असताना अनेकांच्या अडीअडचणीला नेहमी धावून येतात नेहमी त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडांत साखर असणारे हे युवक समाज प्रबोधीत करत रचनात्मक विकासात अव्वल ठरत आहेत.
ऑन ट्रॅक..ऑन टाईम..ही जोडगोळी लोकांसाठी पायाला भिंगरी बांधून सर्वांसाठी धावताना दिसते.या जोडगोळीचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.असा माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विश्वास आहे.आजच्या त्यांच्या एकत्रित वाढदिवसा निमित्ताने…
-आपले कार्य समाजासाठी आदर्श आहे..
-आपले समाज कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे..
-आपल्या सर्मपणाने समाजात बदल घडवला आहे..
-आपले अथक प्रयत्न अनेकांचे जीवन सुधारत आहे..
-आपल्या जागृत संवेदनामुळे अनेकांना नवी दिशा मिळाली आहे..
-आपल्या धैर्याने आणि सेवाभावी वृत्तीने आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळते..
-आपल्या सेवेला सलाम आजचा दिवस आपल्यासाठी सर्वात आनंदी आणि प्रेरणादायी असो!
– वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा राजेंद्रजी
– वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा रामेश्वरजी
– Wish You Happy Birthdayराजेंद्रजी & Rameshwarji*
– महेश भोसले – संगमनेर*
Manavmudrasvs2021@ Gmail.com
