महायुती सरकारच्या या ३९ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ,
नव्या मंत्रिमंडळात अनेक जुन्या मंत्र्यांना डच्चू
नागपूर / लोकवेध live न्यूज
अखेर रविवारी महायुती सरकारच्या
मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारमध्ये मुंडे बंधू-भगिनीला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळात मंत्र्यांचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्मूला राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली.
नागपूर मध्ये ३३ वर्षानंतर दुसऱ्यांदा शपथविधी समारंभ पार पडत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा संधी मिळाली आहे. विखे यांना कोणते खाते मिळते याची आता जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे. महायुती सरकारमध्ये जिल्ह्यातून विखे एकमेव मंत्री आहेत.
आज झालेल्या ३९ मंत्र्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. घराणे शाहीतील १३ जणांना मंत्रिपदी संधी देण्यात आली असून घटक पक्षांना मात्र एकही मंत्री पद देण्यात आलेले नाही.
तर विधान परिषदेतील पंकजा मुंडे या एकमेव महिला आमदाराला कॅबिनेट मंत्रीपदी संधी देण्यात आली आहे.
नव्या मंत्रिमंडळात शपथ घेणारे मंत्री
कॅबिनेट मंत्री
1. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
2. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
3. हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
4. चंद्रकांत पाटील (भाजप)
5. गिरीश महाजन (भाजप)
6. गुलाबराव पाटील (शिवसेना शिंदे)
7. गणेश नाईक (भाजप)
8. दादाजी भुसे (शिवसेना शिंदे)
9. संजय राठोड (शिवसेना शिंदे)
10. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
11. मंगलप्रभात लोढा (भाजप)
12. उदय सामंत (शिवसेना शिंदे)
13. जयकुमार रावल (भाजप)
14. पंकजा मुंडे (भाजप)
15. अतुल सावे (भाजप)
16. अशोक उईके (भाजप)
17. शंभुराज देसाई (शिवसेना शिंदे)
18. अॅड. आशिष शेलार (भाजप)
19. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
20. आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
21. शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
22. अॅड. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित
पवार)
23. जयकुमार गोरे (भाजप)
24. नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
25. संजय सावकारे (भाजप)
26. संजय शिरसाठ (शिवसेना एकनाथ शिंदे) प्रताप सरनाईक (शिवसेना एकनाथ शिंदे)
27.
28. भरत गोगावले (शिवसेना एकनाथ शिंदे)
29. मकरंद जाधव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित
पवार)
30. नितेश राणे (भाजप)
31. आकाश फुंडकर (भाजप)
32. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित
पवार)
33. प्रकाश आबिटकर (शिवसेना एकनाथ शिंदे)
राज्यमंत्री
1. माधुरी मिसाळ (भाजप)
2. आशिष जयस्वाल (शिवसेना एकनाथ शिंदे)
3. पंकज भोयर (भाजप)
4. मेघना बोडर्डीकर (भाजप)
5. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 6. योगेश कदम (शिवसेना एकनाथ शिंदे)
