बाळासाहेब थोरात विधानभवनात नाहीत… भरीव योगदानाची उणीव सर्वत्र जाणवते..!

_40 वर्षांच्या आठवणींना उजाळा देतांना अनेक पत्रकार आणि साहित्यिक व्यक्त करतायेत हळहळ._

लोकवेध live न्यूज 

संगमनेरच्या मातीतील सुसंस्कृत, संयमी, आणि अभ्यासू नेतृत्व बाळासाहेब थोरात आज विधानसभेत नाही, ही गोष्ट *महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी* निर्माण करणारी ठरली आहे. मागील चार दशके आपल्या कामातून विधानसभेत गारुड निर्माण करणारे बाळासाहेब थोरात यावेळी निवडून येऊ शकले नाहीत. हा निकाल त्यांच्या समर्थकांपासून विरोधकांपर्यंत सर्वांनाच अनाकलनीय आणि अविश्वसनीय असा होता.

1985 साली संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या थोरात साहेबांनी सातत्याने मतदारसंघाचं नेतृत्व केलं. *एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून पाटबंधारे, कृषी, जलसंधारण, महसूल* यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांद्वारे त्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि प्रत्येक खात्याला दिलेला योग्य न्याय हा वेळोवेळी *महाराष्ट्राला प्रेरणा देणारा ठरला आहे.*

*_सभागृहात ज्येष्ठतेची व संयमी नेतृत्वाची उणीव…_*

विधानसभेत थोरात साहेब केवळ ज्येष्ठ आमदार नव्हते, तर कुटुंबप्रमुखाप्रमाणे मार्गदर्शन करणारे *विधानभवनाचे मुख्य आधारस्तंभ* होते. कठीण प्रसंगीही शांत राहून मार्ग काढण्याची *त्यांची शैली सर्वांना भावणारी* होती. *त्यांच्या भाषणाच्या वेळी सभागृह शांत राहून त्यांचे विचार आत्मसात* करण्याचा प्रयत्न करत असे. अगदी *विरोधकांना देखील त्यांचे मुद्देसूद भाषण व विचार पटल्याशिवाय राहायचे नाही.*
आज *त्यांच्या अनुपस्थितीत विधानसभेत संयमी नेतृत्वाची उणीव प्रकर्षाने जाणवते,* हे सर्व पत्रकार, साहित्यिक, त्यांचे सहकारी आणि विरोधकही मान्य करत आहेत.

*_संगमनेरला आदर्श नेतृत्वाचा अभाव जाणवतोय…_*

संगमनेर तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आणि ओळख असलेल्या थोरात साहेबांनी येथील सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले. *त्यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचं नाव राज्यात आदराने घेतलं जातं.* मात्र, धार्मिक राजकारण, खोटे आरोप, आणि अपप्रचारामुळे घडलेला हा पराभव *जनतेच्या अजिबातच पचनी पडलेला नाही.* निवडणुकांचे निकाल लागल्यापासून संगमनेर तालुका जणू आपल्या *आदर्श कुटुंबप्रमुखाला मुकला असून पोरका झाल्याची भावना निर्माण झाली* आहे. इथला प्रत्येक व्यक्ती, ज्याने कधी ना कधी थोरात साहेबांकडून मदत घेतली आहे, तो आज *त्यांच्या विधानभवनातील अनुपस्थितीची हळहळ व्यक्त करत* आहे.

आज विधानसभेत नसले तरी *बाळासाहेब थोरात यांचं कार्य, विचार, आणि अनुभव हे कायमच संगमनेर आणि महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरणार* आहेत. संगमनेर आणि *महाराष्ट्रासाठी आजही थोरात साहेबांचा अनुभव, संयमशील कर्तृत्व आणि सकारात्मक नेतृत्वाचा ठसा कायम राहील,* असा विश्वास मात्र सर्वजण व्यक्त करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!