कनोलीतील  विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची  अभ्यासिका 
 माजी विद्यार्थी संदीप पारखे व  पारखे कुटुंबीयांनी नऊ लाख रुपये खर्च करून सुसज्य वाचनालय सुरू केले 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 

अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नसते, सोयी सुविधांचा अभाव असतो  गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा इतर कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये हा विचार मनात आला आणि कनोली गावातील थोरात विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक संदीप रमेश पारखे यांनी  नऊ लाख रुपये खर्च करून आजी कौशल्याबाई मारुती पारखे यांच्या स्मरणार्थ आई-वडिलांच्या नावाने सिंधुरम नावाने वाचनालय सुरू केले  उत्तम बैठक व्यवस्था, एसी, ऑनलाईन अभ्यास, सुसज्ज लायब्रेरी व अत्याधुनिक सुविधा अशी या अभ्यासिकेची वैशिष्ट्ये आहेत. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल

सिंदूरम वाचनालयाचा लोकार्पण सोहळा  गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयात संपन्न झाला.

या वाचनालयाचे उद्घाटन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जगद्गुरु अरुण गिरी महाराज भामाठाण यांच्या शुभहस्ते झाले

 यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे  सह सेक्रेटरी दत्तात्रेय चासकर सर, रजिस्ट्रार बी.आर.गवांदे सर, संचालक सिताराम वर्पे, मुख्याध्यापक भारत कुटे सर  शिवाजी वर्पे, नामदेव वर्पे, सरपंच भाऊसाहेब पवार, पोलीस पाटील नानासाहेब वर्पे, ग्रा ग्रामपंचायत  सदस्य बंडू त्रिंबक वर्पे, ज्ञानदेव वर्पे, मुख्याध्यापक के.एम. वर्पे सर, आर.डी. जगताप सर, सिंदूरम उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष संदीप रमेश पारखे, रमेश मारुती पारखे, सजन मारुती पारखे,राजू पारखे, माजी सरपंच मनोहर पारखे, सुरेश जगताप,शशिकांत शार्दुल, रवी पडघलमल, किशोर साळवे, राहुल कटारे, प्रभाकर कटारे, बाळासाहेब पराड, शांतवन बनसोडे, पुणे येथील उद्योजक अनिल रोडे, सुजित गुरव, विजय रोडे, गणेश पवळे, विठ्ठल वाघाडे ,अमोल सोनवणे, गणेश तळेकर, उद्योजक संदीप रमेश पारखे  यांनी स्वनिधीतून नऊ लाख रुपये खर्च करून शाळेला नवीन इमारत बांधून शाळेचे ऋण व्यक्त केले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खरात सर, थोरात सर यांनी केले.प्रस्ताविक प्राचार्य वर्पे के. एम. सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार दिघे सर यांनी मांडले सर्व मान्यवरांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!