गणेश उघडे यांची सुरक्षा असंघटित कामगार संघटना पैठण तालुका उपाध्यक्ष पदी निवड

पैठण / लोकवेध live न्यूज 

पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव येथील युवा तरुण सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले गणेश सखाराम उघडे रा मुलानी वाडगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक, क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता सुरक्षा असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेत पैठण तालुका उप अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.संघटनेचे ध्येय धोरण व असंघटित कामगारांच्या समस्या जाणून घेऊन संघटनेचे पुढील उद्दिष्ट असंघटित कामगारांना न्याय हक्क अधिकार प्राप्त करुन देण्याकरिता निवड करण्यात आली आहे.सुरक्षा असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर भाऊ बर्फे म्हारोळा यांनी संघटनेचे संपर्क कार्यालय येथे नियुक्ती पत्र देऊ पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. सुरक्षा असंघटित कामगार संघटनेचे बिडकीन सर्कल अध्यक्ष दिलीप जोशी, लोहगाव सर्कल अध्यक्ष अशोक काळे ,निलजगाव सर्कल अध्यक्ष संजय पवार, आदींची यावेळी उपस्थिती होती.गणेश उघडे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!