जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी यशोधन तत्पर – डॉ.जयाताई थोरात
संगमनेर / लोकवेध live न्यूज
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात अहमदनगर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व अधिकारी यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.जयाताई थोरात म्हणाल्या की, स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जनसेवेचा वारसा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने काम केले आहे. जनतेचे मोठे प्रेम त्यांच्यावर असून तालुक्यात प्रत्येक गावात विकासाची कामे त्यांनी राबविली आहेत. जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असणाऱ्या या लोकनेत्याच्या यशोधन कार्यालयाने तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या पुढील काळातही तत्परतेने सर्व विभागांमधून येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
लोकनेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील स्वच्छ प्रतिमा असलेले व मोठा जनाधार असलेले लोक नेतृत्व आहे. त्यांचा स्वभाव व प्रामाणिकपणे काम करण्याची पद्धत यामुळे संगमनेर तालुक्यात एक तालुका एक परिवार ही संकल्पना रुजली आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून 171 गावे आणि 248 वाड्यावस्त्या असून प्रत्येक गावातील विकासासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने काम केले आहे. याचबरोबर निळवंडे धरण व कालव्याचे काम पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. त्यामुळे आज तळेगाव गटातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आले आहे. वितरिकांच्या माध्यमातून हे पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात हे पाठपुरावा करत आहे. संगमनेर शहरातील थेट पाईपलाईनसह विविध हायटेक इमारती, नागरिकांसाठी सुविधा, भरलेली बाजारपेठ यामुळे संगमनेर हे मध्यवर्ती मोठे शहर म्हणून उदयास आले आहे. विकासकामांबरोबर तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी सुरू केलेले यशोधन कार्यालय हे 24 तास कार्यरत आहे. प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी विविध विभाग तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठी मदत केली जात आहे. याचबरोबर विविध शासकीय योजना व गावगावच्या विकास कामांसाठी पाठपुरावा केला जात आहे.
यशोधन कार्यालय हे मदतीचे केंद्र ठरल्याने जिल्ह्यातील व राज्यातील विविध राजकीय नेत्यांच्या कार्यालयाने या कार्यालयास भेट देऊन अनुकरण केले आहे. याचबरोबर उत्तर प्रदेशातील अमेठी मतदार संघातही यशोधन कार्यालयाचा पॅटर्न राबवण्यात आला आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कार्यालयाच्या कामासाठी अधिक संपर्क करता 02425 – 227303,04 किंवा 9689304304 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यशोधन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात यांच्याशी थेट संपर्क
लोकनेते बाळासाहेब थोरात हे जनतेशी सातत्याने संपर्कात राहणारे नेते आहेत. अगदी सर्वसामान्य माणसालाही भेटण्यासाठी कधीही कुणाची मध्यस्थीची गरज भासत नाही.अगदी सामान्य माणसाने फोन केला तरी त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने केली आहे. ही संगमनेर तालुक्यातील आणि राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी सदैव अभिमानाची बाब राहिली आहे. यशोधन कार्यालयामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात यांच्याशी थेट संपर्क होत असल्याचे यशोधन कार्यालयाचे मुख्याधिकारी डॉ.नितीन भांड यांनी म्हटले आहे.