सोनेवाडी गावात “आजि सोनियाचा दिनू..”
संगमनेर / लोकवेध live न्यूज
“गावचा तरुण बदलला की गाव देखील बदलतं” याचा प्रत्यय आज संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी गावातून येत आहे. चार वर्षांपूर्वी गावातील तरुणांनी ठरवलं आणि उघड्या बोडक्या गावाला आज हिरवाई नटवलं. गावामध्ये विविध देशी वृक्षांची लागवड करून येथील तरुणांनी गाव हिरवगार तर केलंच पर्यातून गावाच्या समृद्धीची नवीन दिशा उघडी झाली.
पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये राहून देखील गावासोबत असणारी नाळ येथील तरुणांनी कायम ठेवली आणि त्याच जाणिवेतून त्यांनी गावासाठी आपला वेळ देत गावात अनेक विधायक कामे केली. या प्रेरणादायी प्रवासात त्यांना साथ मिळाली सप्रेम सामाजिक संस्था नवदुष्टी संस्था आणि डॉर्फ कॅटल इंडिया लिमिटेड च्या सीएसआर फंडची.
डार्क कॅटल मँगो कप अंतर्गत तरुणांनी गावामध्ये 900 अंबा वृक्षांची लागवड केली तसेच या अगोदर त्यांनी गावामध्ये पडीत क्षेत्रावरती चिंच वृक्षांची लागवड देखील केलेली आहे.
2025 वर्षांमध्ये आपला उत्साह द्विगुणीत करत त्यांनी नव्याने डॉर्फ केटल जंगल कप मध्ये सहभाग नोंदवला आणि आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी गावामध्ये मीयावाकी फॉरेस्ट ची लागवड केली.
याप्रसंगी डॉर्फ केटल केमिकल इंडिया लिमिटेड सीएसआर प्रमुख डॉक्टर संतोष जगधाने, सप्रेम सामाजिक संस्थेचे डॉक्टर प्रकाश गायकवाड, प्रकल्प समन्वयक हिमांशू लोहकरे आणि नवदृष्टी संस्थेच्या सौ.नताशा जगधणे मॅडम उपस्थित होत्या.
मी या वाक्य वृक्ष लागवडीनंतर तरुणांनी गावात इतर विधायक कामे करण्या बद्दल नियोजित तसेच प्रस्ताव डॉक्टर संतोष जगताने सीएसआर हेड डॉर्फ कॅटल केमिकल्स इंडिया यांच्यासमोर मांडला.
याप्रसंगी बोलताना सप्रेम संस्थेचे डॉक्टर प्रकाश गायकवाड यांनी तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली तसेच यापुढे देखील मार्गदर्शनाची जबाबदारी घेतली.
सौ. नताशा जगधने मॅडम यांनी गावांमधील कामात महिलांचा सहभाग यावर विशेष टिप्पणी तसेच अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन ग्रामपंचायत सदस्य व तरुणांना केले.
डॉक्टर संतोष जगधने यांनी मी यावाकी जंगल लागवड याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच अशा प्रकल्पांची गरज व महत्त्व पटवून दिले.
डॉर्फ केटल जंगल कप 2.0 ची आज औपचारिक रित्या सुरुवात झाली.
सोनेगाव गावामधून आज या सोन्यासारख्या कार्याची सुरुवात झाल्याबद्दल सर्वच मान्यवरांना मध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.