डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व समाज्यासाठी न भूतो , ना भविष्य असे काम – मा.प्राचार्य अण्णासाहेब वाकचौरे
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज्यासाठी न भूतो , ना भविष्य असे काम केल्यानेचं मानव समाज्याचे मोठे कल्याण झाले तर ते सर्व समाज्याचे दैवत असल्याने त्यांची जयंती सर्व समाज्याच्या एकोप्याने मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे माजी प्राचार्य अण्णासाहेब वाकचौरे यांनी केले संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे ग्रामपंचायत व नीलक्रांती युवा मंच व युवकांच्या पुढाकारातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली
यावेळी छत्रपती शिवाजी चौकात ग्रामस्थांनी एकत्र येत सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेबांना अभिवादन केले
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर राजेंद्र देशमुख शिवराम वाकचौरे दिनकर वाकचौरे दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम काकासाहेब गायकवाड अण्णासाहेब वाकचौरे विनोद साळवे गंगाराम वाकचौरे धोंडीबा साळवे उत्तमनाना राहिंज मुख्याध्यापक संजय बोरसे प्रदीप बागुल संजय बागुल राहुल बागुल निलेश बागुल उत्तम भालेराव राहुल निकम निलेश रोहम पोपट साळवे मनीषा बागुल राजेंद्र बागुल बाळासाहेब काळे अंकुश राहींज सुरेश बागुल दत्तात्रय पवार गौतम भालेराव बाळासाहेब काळे आधी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
तसेच परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व जि.प.प्राथमिक केंद्रशाळा येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यातआली.
यावेळी मुलांनी भाषणे,गाणी,पोवाडे सादरीकरण केले.मुख्याध्यापक आदरणीय श्री. संजय उत्तम बोर्से सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.यावेळी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
