मा. श्री. भा. सं. थोरात माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, कनोली या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज

मा. श्री. भा. सं. थोरात माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, कनोली या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य नामदेवराव वर्पे, अमृतवाहिनी बँकेचे संचालक शिवाजीराव जगताप, छबूराव पगारे, शरद जगताप, विद्यालयाचे प्राचार्य श्री. वर्पे के. एम., प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कोटकर सर. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपले विचार मांडले. तसेच प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती पवार मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहिंज सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्री खरात सर यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!