सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

 

माढा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद

प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री आणि सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या निवेदिका प्राजक्ता माळी यांनी आज सायंकाळी सहकुटुंब कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. माळी कुटुंबीयांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची ओटी भरत पारंपरिक धार्मिक कुलधर्म कुलाचार केले.
प्राजक्ता माळी यांनी स्वदेस, पावनखिंड, चंद्रमुखी, फुलवंती यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्या एक कुशल निवेदिका आणि संवेदनशील कवयित्री म्हणूनही सर्वांना परिचित आहेत.
मंदिर संस्थानच्या वतीने श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन प्राजक्ता माळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, अतुल भालेराव, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, ऋषभ रेहपांडे, दीपक शेळके, श्रीकांत पवार व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!