चंदनापुरी सावरगावतळ रस्त्याचे काम गुणवत्तेचे करावे -आ खताळ
चंदनापुरी सावरगावतळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर रस्त्याच्या कामाचा आ खताळ यांच्या हस्ते शुभारंभ
संगमनेर / लोकवेध live न्यूज
राज्य सरकार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा यांच्या माध्यमातून चंदनापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर या रस्त्यासाठी साडेसहा कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे ठेकेदाराने या रस्त्याचे काम चांगल्या गुणवत्तेचे करावे असे निर्देश आमदार अमोल खताळे यांनी दिले
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे चंदनापुरी सावरगावतळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर रस्त्या रुंदीकरण आणि डांबरीकरण तसेच कौठमाळा ते काशी आई मंदिर सावरगाव तळ या रस्त्याचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यास पीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे शिव सेनेचे तालुका आध्यक्ष रामभाऊ राहाणे भाजप जेष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिव सेना उपतालुकाप्रमुख बादशाह गुंजाळ शहरप्रमुख दिनेश फटांगरे सुशील शेवाळे अजित जाधव प्रमोद राहणे रोहिदास राहणे ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे संगमनेर खुर्द गट प्रमुख श्याम राहणे चंदनापुरीचे पोलीस पाटील ज्ञानदेव राहणे सावरगावतळच्या सरपंच सौ अनिता नेहे बाळासाहेब शेटे परसराम नेहे रावसाहेब थिटमे पोपट नेहे शरद नेहे दादाभाऊ शिरतार माधव राहणे एम डी राहणे बाळू सरोदे, नितीन राहाणे बाबा साहेब राहाणे संजय भालेराव विलास राहाणे, अमोल रहाणे योगेश राहाणे सुरेश राहणे योगेश घोगरे सागर रहाणे कार्तिक राहाणे ,ज्ञानेश्वर राहाणे शांताराम बो-हाडे किरण बो-हाडे सार्वजनिक बांधकाम विभाग अकलेचे उपविभागीय अभियंता जगदीश कडाळे डी एम ठाकरे,श्रीमती ठाणेकर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर योगेश गाडे ग्रामविकास अधि कारी रामदास काळे सावरगाव तळच्या ग्रामसेविका माधुरी शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ खताळ म्हणाले की रस्त्याचे काम होत असताना कुठलीही अडचण येऊ देऊ नका.आली तर सावरगावतळ आणि चंदनापुरी येथील शेतकर्यांनी समन्वयातून मार्ग काढावा. पूर्वीसारखे आता कुणाचा ही ठेकेदारांवर दबाव राहिला नाही. टक्के वारीचा तर विषय येतच नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम चांगल्या गुणवत्तेचे करावे असे सक्त ताकीद आ.खताळ यांनी या रस्त्याच्या ठेकेदाराला दिली. संगमनेर तालुक्यातील रस्त्याचे ,पाण्याचे तसेच इतर काही विकास कामे राहिली असेल तर ती सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.परंतु आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे रहा. रस्त्याचे काम होत असताना ठेकेदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याची दोन्ही गावातील नेत्यांनी दक्षता घ्यावी रस्त्याचे काम ठेकेदाराने चांगल्या गुणवत्तेचे केले नाही तर त्यात दुरुस्ती करण्याची तरतूद आहे.त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत तुम्ही तुम्ही निश्चित राहा असाही सल्ला आ अमोल खताळ यांनी दोन्हीही गावच्या नागरिकांना दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे यांनी केले तर आभार सावरगावतळ शिवसेनेचे नेते शरद नेहे यांनी मानले
