धांदरफळ मध्ये प. पू. सद्गुरू नारायण महाराज यांचे उत्तर अधिकारी प. पू. सद्गुरू टेंभे स्वामी यांची भव्य मिरवणूक व भव्य नागरी सत्कार
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
श्री धौम्य ऋषींचा पदस्पर्शाने पावन झालेल्या , श्री धौम्य ऋषींचा आश्रम असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर आश्रम , धांदरफळ बु. या ठिकाणी विश्व चैतन्य प. पू. सद्गुरू नारायण महाराज ( श्री क्षेत्र नारायणपूर, ता. – पुरंदर, जि.- पुणे) यांच्या आशीर्वादाने
प. पू. सद्गुरू टेंबे स्वामी याच्या मार्गदर्शनाने सुरू असलेल्या आती भव्य शिवपुराण महाकथा , सामुदायिक गुरुचरित्र पारायण व महारुद्र याग यज्ञ ह्या कार्यक्रमाची समाप्ती निमित्त प. पू. सद्गुरू नारायण महाराज यांचे उत्तर अधिकारी प. पू. सद्गुरू टेंभे स्वामी यांची भव्य मिरवणूक व भव्य नागरी सत्कार* धांदरफळ नगरीत दिनांक ४/६/२०२५ वार बुधवार ह्या दिवशी सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे .
सदर कार्यक्रमासाठी सर्व गुरुबंधू, यात्रेकरू व दत्त भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती
*कार्यक्रमाची रूपरेषा*
दिनांक ४/६/२०२५ वार बुधवार
दुपारी ३.३० ते ४ स्वामींची मोटरसायकल रॅली पुणे नाशिक हायवे ते धांदरफळ गावा
सायंकाळी ४ ते ६ स्वामींची भव्य मिरवणूक धांदरफळ नगरीत
सायंकाळी ६.३० ते ७ स्वामींच्या हस्ते रामेश्वर शिवलिंगाला अभिषेक पूजन व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण समाप्ती
सायंकाळी ७ ते ७.३० स्वामींचा व शिवपुराण कथेचे वक्ते श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, आमदार अमोल खताळ पाटील भव्य नागरी सत्कार व त्या नंतर स्वामींचे प्रवचन व दर्शन व नंतर सर्व कार्यक्रम आवरून महाप्रसाद
*आपले नम्र*
*हरिओम मित्र परिवार, वृक्ष मित्र परिवार,*
*श्री दत्त सेवेकरी मंडळ*
*संगमनेर, अकोले सिन्नर*
सदर माहिती रविंद्र (बापू) देशमुख अध्यक्ष दत्तसेवेकरी मंडळ संगमनेर अकोले सिन्नर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे
