अनोख्या दिंडीचे कौतुक!..
वारीमुळे लहान मुलांवर आध्यात्मिक आणि नैतिक संस्कार…. प्राचार्य श्री.गाडेकर सर
संगमनेर / लोकवेध live न्यूज
वारीमुळे लहान मुलांवर चांगले आध्यात्मिक आणि नैतिक संस्कार होतात.वारीमध्ये सहभागी होऊन मुलांमध्ये श्रध्दा,भक्ती,धर्मविषयिचा आदर तसेच धर्मरक्षणाचे काम नविन युवा पिढीकडून होण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल,सर्व धर्म* *समभाव,समाजएकिचे दर्शन घडते.आणि समाजासाठी आपण देखील काही तरी देणे लागतो म्हणून काही तरी करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात वाढीस लागते.असे प्रतिपादन प्राचार्य श्री.गाड़ेकर सर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिलीप बेलोटे सर,रनाते सर, डागवाडी शाळेच्या सौ.डावरे मँडम यांनी केले.संगमनेर तालुक्यातील अभोरे येथिल*
*मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थि,विद्यार्थिनिंनी सजवलेल्या रथातुन ‘विठ्ठल-रुख्मिणी प्रतिमा ठेवत भव्य मिरवणूक करत आणि बालगोपाळां अनोख्या दिंडीने मोबाईलचे दुष्परिनाम,बळीराजाची कथा,सर्वधर्म समभाव शिक्षणाचे महत्व,झाडांचे महत्व,पर्यावरणातुन गावोगावी समाज प्रबोधन,या दिंडीसोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना* *आपल्या संस्कृती व परंपरेची जाणीव होते आणि त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची जपवणूक होते.शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य,विद्यार्थी -विद्यार्थिनिंनी साक्षात विठ्ठल-रुख्मिणीची वेशभुषा सजावट केली होती तर काही मुलींनी तुळसी वृंदावन आपल्या डोक्यावर घेतले होते त्यामुळे पुरुष,महिला ग्रामस्थांचे विशेष आकर्षण म्हणून लक्ष वेधून घेतले.वारीमध्ये मुलांचा देवाशी आणि वारक-यांशी सबंध येतो.त्यामुळे त्यांच्यात आध्यात्मिक जाणीव जागृत होते.वारीमध्ये मुलांचे समाजात आणि निसर्गाशी संबध येतात ज्यामुळे त्यांच्यात नैतीकता,समजुतदारपणा,सहानूभुती वाढते.अंभोरे गावात आज शनिवार दि.०५/०७/२०२५ रोजी भक्तिमय वातावरणात,’ज्ञानोबा माऊली तुकाराम’ विठ्ठल – विठ्ठला,हरी ओम विठ्ठला,’जय घोषात परिसर दुमदुमून गेला होता.पारंपारीक वेशभुषेत असलेल्या विद्यार्थ्यांकडे टाळ होते.शाळेच्या प्रांगणातुन गावातील मुख्य रस्त्याने हनुमान मंदीर,गगनगिरी महाराज,जय बाबाजी चौक मार्गे विठ्ठल-रुख्मिणी मंदीरासमोरील सभामंडपात समारोप करण्यात आला.यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि संत ज्ञानेश्वर,तुकाराम,एकनाथ महाराजांचे विविध अभंग गात अंभोरे गावातील भजनी मंडळाने आपला सहभाग नोंदवला त्यामुळे दिंडीला एक चांगले स्वरुप प्राप्त झाले आणि बघता-बघता धार्मिक वातावरण तयार झाले तर अंभोरे गाव काही काळासाठी अवघे प्रति पंढरपूर झाले त्यामुळे ग्रामस्थ,महिला,पुरुष,युवक यांना आपल्या लाडक्या ‘विठ्ठल- रुख्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेत हा दिंडी सोहळा बघुन खरोखर आपण ‘विठ्ठल-रुख्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती.काही काळ प्रति पंढरपुर झाले.पंढरपुर आषाढी वारीचा आनंद आपल्याला मिळाला हा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होता.यामूळे काही काळ अंभोरे गाव प्रति पंढरपुर झाले. अशी कुजबुज ग्रामस्थ,नागरिकांत होती.दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,प्राचार्य श्री.गाडेकर सर,मुख्याध्यापक यांचे सह.प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका इतर सेवक वृंद यांनी यासाठी जे परिश्रम घेतले त्या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.अंभोरे गावातील ग्रामस्थ,युवक यांचेसह सामाजिक,राजकिय,धार्मिक,क्षेत्रांतील मान्यंवरांची उपस्थिती लाभली.अंभोरे गावचे भजनी मंडळाचे डॉ.नानासाहेब कोटकर,रेवजी आंदू खेमनर ,श्री.लक्ष्मण रावजी खेमनर ,कचरु राणू खेमनर ,श्री.शिवाजी गंगाधर खेमनर,श्री.तारडे ,श्री.बाळासाहेब खेमनर ,श्री.तुळशीराम खेमनर ,श्री.जगन बर्डे,श्री.ज्ञानेश्वर माऊली खेमनर ,श्री.सुभाषराव हळ्नोर सौ.शालनबाई सुर्यवंशी यांचे विशेस सहकार्य लाभले.सर्वांनी उत्साहाने दिंडी सोहळ्याचे स्वागत आणि सहभाग घेतला त्याबदद्ल आभार व्यक्त केले.
