संतोष रोहम यांना दृष्टी नसली तरी दृष्टि कोन आहे -सौ विखे

शेतकरीनेते संतोष रोहम यांचा आअमोल खताळ मित्रमंडळाच्या वतीने गौरव

संगमनेर / लोकवेध live न्यूज

शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे शेतकरी नेते संतोष रोहोम यांना दृष्टी नसली तरी त्यांच्याकडे असलेल्या दृष्टीकोनाला समाजानेपाठींबा दिला आहे.मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मदतीने जगण्याची उमेद मिळालेला एक सच्चा नेता हा या परीवर्तानचा शीलेदार असल्याचा गौरव जिल्हा परिषदेच्यामाजी अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी केला.
संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे आ.अमोल खताळ मित्र मंडळाच्या वतीने शेतकरी नेते संतोष रोहम यांच्या जन्मदिनाच्या उचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते दशरथ सावंत आ.अमोल खताळ त्यांच्या पत्नी नीलम खताळ शेतकरी नेते संतोष रोहम यांच्या पत्नी शारदा रोहम
बापुसाहेब गुळवे वसंतराव गुंजाळ सुदाम सानप डॉ अशोक इथापे भाजप अध्यक्षा सौ.पायल ताजणे श्रीकांत गोमासे गुलाब भोसले गोकुळ दिघे राहुल दिघे हरिश्चंद्र चकोर वैभव लांडगे शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे रामभाऊ राहणे दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी जनार्दन आहेर आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार रौफ़ शेख ऋतिक रोहन आणि राहुल रोहन बंडूनाना देशमुख यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्तेमहीला युवक जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ.विखे म्हणाल्या की,संतोष हे नावच त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असेच आहे.त्यांनी केलेल्या संघर्षात खूप काही दडलेल आहे.आजोबांकडून मिळालेला विचारांचा आणि संघर्षाचा वारसा त्यांनी पुढे नेण्याचे काम त्यांच्या कडून सुरू असल्यानेच प्रश्नाची मांडणी संतोष रोहोम करू शकतात.यामागे त्यांच्या दृष्टीकोन होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा देवून समाजातील लोकांना न्याय मिळवून देणारा असल्याचे सौ.विखे म्हणाल्या.
जेष्ठ नेते दशरथ सावंत यांनी आपल्या भाषणात परीवर्तानाच्या काळातील एक सच्चा नेता म्हणून संतोष रोहोम यांची नोंद झाली आहे.भगतसिंगा सारखे धाडस त्यांनी दाखवले.डॉ आंबेडकर यांचे विचार फक्त नावासाठी विचार जपणारे अनेकजण आहेत.मात्र रोहोम यांनी त्या विचारावर वाटचाल करून राजकाराणात सकारात्मक पर्याय उभे करण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.अमोल खताळ यांनी संतोष रोहोम म्हणजे राजकीय सामाजिक चळवळीत नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे.अनेक आंदोलनात त्यांच्या समवेत सहभागी झालो.खूप काही शिकायला मिळाले .आलेल्या दिव्यांगावर मात करून त्यांनी मला विधानसभेच्या निवडणुकीत केलेले मार्गदर्शन मोलाचै ठरले.त्यांच्या संकल्पने तील विकासाची प्रक्रीया तालुक्यामध्ये राबविताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल.अतिशय संकाटाच्या काळात संतोष रोहोम यांची पत्नी आणि मुलांनी त्यांना दिलेला आधार कौतुकास्पद असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले.

आपल्या सत्काराला उतर देताना संतोष रोहोम म्हणाले की,कोव्हीड संकटात आलेल्या अंधत्वावर मात करण्यासाठी अनेक मित्रांनी आधार दिला.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे आज मी आपल्यात आहे. तालुक्यातील अनेक प्रश्नासाठी संघर्ष केला.यातून तयार झालेल्या वातावराणा तून परीवर्तन झाले अन आमचा चाळीस वर्षाचा वनवास संपला. असल्याचे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!