लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे संगमनेर तालुका विकसित-आमदार तांबे
किर्तन सप्ताह, क्रिकेट स्पर्धा, रक्तदान शिबिर, व्याख्याने, यांसह विविध कार्यक्रम
संगमनेर / लोकवेध live न्यूज

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणता राजा मैदान येथे राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर तळेगाव अंभोरे ,पेमगिरी येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, करण्यात आला कुरण येथे भव्य आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तर जोर्वे, देवकौठे, पिंपरणे येथे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन झाले.
तर अमृत संस्कृतीक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर यांसह सह्याद्री विद्यालयात व्याख्यानांचे आयोजन झाले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आजी माजी पदाधिकारी व आजी माजी सेवकांचा मेळावा संपन्न झाला याचबरोबर सह्याद्री महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनातील आनंद मेळावा ही सुरू आहे.
यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी विकसित संगमनेर तालुक्याचे पाहिलेले स्वप्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले. 1985 पासून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता दूरदृष्टीतून त्यांनी काम केले 1989 मध्ये हक्काचे पाणी मिळून पाईपलाईनचे जाळे निर्माण केले. त्यानंतर सरकार आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला जालना दिली. संगमनेर मध्ये मोठमोठ्या पायाभूत सुविधा त्यांनी निर्माण केल्या . निळवंडे धरण व कालव्यांसारखे ऐतिहासिक काम पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले. सुसंस्कृत आणि वैभवशाली तालुका बनवण्यात लोकनेते बाळासाहेब थोरात यांची दूरदृष्टी असून संगमनेर तालुक्याचे नाव देशपातळीवर नेणाऱ्या या नेतृत्वाने आपल्या कार्यकर्तुत्वाने राज्यभर कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण केला आहे. त्यांच्या नेतृत्वाची संगमनेर तालुक्यातील महाराष्ट्राला गरज आहे.त्यांचे व्यक्तिमत्व हे नव्या कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणादायी असून त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. यावेळी यशोधन कार्यालयातील अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील 171 गावांमध्ये त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. तर त्यांच्या अभिनंदनचे होर्डिंग कार्यकर्त्यांनी गावोगावी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या याचबरोबर नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई, ठाणे,नागपूर, गोंदिया, कोल्हापूर ,रायगड, औरंगाबाद, नंदुरबार व जळगाव या ठिकाणीही माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या अभिनंदन कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या विविध कार्यक्रमांच्या वेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात , ॲड माधवराव कानवडे,रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ थोरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
तरुणाईच्या मोबाईलवर उधळीन जीव तुझ्या पायी माणसा या गीताच्या रील्स
काँग्रेसचे मा. प्रदेशाध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप या सर्व माध्यमांवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या विविध छबी होत्या. याचबरोबर त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेणारे विविध चित्रफीत व अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांनी गायलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या जीवनावरील गीते ही सर्वाधिक आकर्षण ठरले. याचबरोबर संगमनेर तालुक्यात सर्वत्र मानसा उधळीने जीव तुझ्या पायी या गीतावरील रिल्स सर्वत्र होत्या.