आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधूनच तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी 616 कोटी रुपयांचा निधी
76 गावे व 406 वाडी वस्तीला शाश्वत पाणीपुरवठा
संगमनेर लोकवेध live न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. रचनात्मक विकासाकडून वैभवाकडे वाटचाल करणाऱ्या तालुक्यातील 76 गावे व 406 वाडी वस्ती यांना शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी आमदार थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून व प्रयत्नातून तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनेसाठी 616 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.
![]()
याबाबत अधिक माहिती देताना इंग्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात हे पाण्याचे आमदार म्हणून सर्वप्रथम 1985 मध्ये विधानसभेत गेले. त्यानंतर तालुक्यातील पाण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष करून 1989 मध्ये 30 टक्के हक्काचे पाणी मिळवले. याचबरोबर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केले.
या धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यासाठी सातत्याने सरकारमधून मोठा निधी मिळवून रात्रंदिवस कामे सुरू ठेवली. खरे तर ऑक्टोबर 2022 मध्येच पाणी देण्याचे आमदार थोरात त्यांनी नियोजन केले होते. मात्र सत्ता बदल झाला आणि कालव्यांची कामे थंडावली. तरीही या कालव्यांचा पाठपुरावा आमदार बाळासाहेब थोरात हेच करत असून तेच दुष्काळी भागाला पाणी देणार आहे.
याचबरोबर प्रत्येक गावात सिमेंट, बंधारे, नालाबर्डीग यांची मोठे जाळे निर्माण केली असून तालुक्यातील प्रत्येक गावात शुद्ध व शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तळेगाव, घुलेवाडी, निमोण, चंदनापुरी, वरवंडी, निमगाव बुद्रुक या पाणीपुरवठा योजनांसाठी 616 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.
यामध्ये तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 81 कोटी रुपये, घुलेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी 81 कोटी रुपये, वरवंडी पाणीपुरवठा योजनेसाठी 33 कोटी रुपये ,निमगाव बुद्रुक व चंदनापुरी पाणीपुरवठा योजनेसाठी प्रत्येकी 60 कोटी, रुपये निमोण पाणीपुरवठा योजनेसाठी 63 कोटी रुपये अशा विविध योजनांचा समावेश आहे.
या पाणीपुरवठा योजनांना लवकर सुरुवात होणार असून यामुळे तालुक्यातील या योजनांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांना शुद्ध व शाश्वत पाणी मिळणार आहे. याचबरोबर चालू अर्थसंकल्पातून तालुक्यातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 86 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मिळवला आहे.यात समवेत निमगाव भोजापूर येथील महाळुंगी नदीवरील पुलाकरता 3 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.
या सर्व पाणीपुरवठा योजनांच्या पाठपुराव्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, यांनीही विशेष प्रयत्न केले आहे.
