कनोली विद्यालयाची वृक्ष संवर्धनाची पायी दिंडी, कनकापूर मध्ये दिंडीची सांगता 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

शनिवार दि.४जुलै२०२५रोजी मा.श्री.भाऊसाहेब संतुजी थोरात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ, मृदुंग,वाद्याच्या तालावर वारीचा प्रवास कनकापूर पर्यंत झाला. कनकापूर गावच्या सरपंच सौ.ज्योतीताई पचपिंड श्री.संतोष शिंदे,(पो.पाटिल), आबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्थेचे पदाधिकारी महिला भजनी मंडळ यांनी विठ्ठल रुक्मिणी व दिंडीचे स्वागत उत्तमरीत्या पूजन व फटाक्यांच्या आतिषबाजीत केले. सर्व शिक्षकांचा सन्मान व सत्कार केला तसेच माजी विद्यार्थी शिवप्रसाद वर्पे यांनी कीर्तन रुपी प्रवचन केले कनकापूर गावातील सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मिष्ठांना भोजन साबुदाणा खिचडी,केळी,राजगिऱ्याचे लाडू ,बिस्कीट पुडे,असे सुरुची भोजन दिले शाळेतील शिक्षकांनी रोपे वाटून आभार मानले. स्था.स्कूल कमि.अध्यक्ष सिताराम पा. वर्पे, नामदेव वर्पे ,वर्पे शिवाजी (व्य.अध्यक्ष) धात्रक साहेब,रमेश पारखे,प्राचार्य गायकवाड सर, मुख्या.कोटकर सर मा.प्रा.के.एम.वर्पे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोरात सर यांनी केले. दिंडी सोहळ्याचे आयोजन सर्व शिक्षकवृंद कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!