परमपूज्य गगनगिरी विद्यालयाची धार्मिक सामाजिक आणि समतेची पिंपरणे गावातून निघाली दिंडी 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
पिंपरणे येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची दिंडी येथिल प. पू. गगनगिरी महारान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांची  दिंडी काढण्यात आली. विद्यालयातील वि‌द्यार्थी-विद्यार्थीनी दिंडीमधे मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. विद्यार्थिनींनी डोक्यावर कलश, होऊन पारंपारीक वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत सहभाग घेतला.
अनोख्या दिंडीने मोबाईलचे दुष्परिनाम,बळीराजाची कथा,सर्वधर्म समभाव शिक्षणाचे महत्व,झाडांचे महत्व,पर्यावरणातुन गावोगावी समाज प्रबोधन,या दिंडीसोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती व परंपरेची जाणीव होते आणि त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची जपवणूक होते.शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य,विद्यार्थी -विद्यार्थिनिंनी साक्षात विठ्ठल-रुख्मिणीची वेशभुषा सजावट केली होती तर काही मुलींनी तुळसी वृंदावन आपल्या डोक्यावर घेतले होते त्यामुळे पुरुष,महिला ग्रामस्थांचे विशेष आकर्षण म्हणून लक्ष वेधून घेतले.वारीमध्ये मुलांचा देवाशी आणि वारक-यांशी सबंध येतो.त्यामुळे त्यांच्यात आध्यात्मिक जाणीव जागृत होते.वारीमध्ये मुलांचे समाजात आणि निसर्गाशी संबध येतात ज्यामुळे त्यांच्यात नैतीकता,समजुतदारपणा,सहानूभुती वाढते. पिंपरणे गाव भक्तिमय वातावरणात,’ज्ञानोबा माऊली तुकाराम’ विठ्ठल – विठ्ठला,हरी ओम विठ्ठला,’जय घोषात परिसर दुमदुमून गेला होता.पारंपारीक वेशभुषेत असलेल्या विद्यार्थ्यांकडे टाळ होते
प्राचार्य श्री. रमेश वाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची टाळ मृदंगच्या नादात, मूखी विठठ्ठल नामाचा जयघोष, पारंपारीक वेशभूषा अशी मोठ्या थाटात ही दिंडी विद्यार्थ्यांचे  लक्ष वेधून घेत होती. कु. दिव्या गणेश खेमनर व सार्थक दिपक रक्टे यांनी विठ्ठल-रुकिणी ची वेशभूषा केली केली होती. सुरुवातीला प्राचार्य व सर्व शिक्षक यांनी विठठ्ठल साख्मणीच्या मूर्तीची पूजा केली. व विद्यार्थ्यांनी टाळ वाजवत विठल नामाचा जयघोष केला. श्री. दत्तात्रय घोगरे यांनी विद्यार्थ्यांना विविध संतांची माहिती देत आषाढी एकादशीचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाव्या यशस्वीतेसाठी श्रीमती कविता ढोमसे श्रीमती अलका हासे, श्रीमती स्वाती थोरात श्रीमती माधवी मुटकुळे यांनी विषेश परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!