मिशन आरंभ’ लोकचळवळ झाली- शिक्षणाधिकारी भास्कर पाटील

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

दिं.१५ जुलै २०२५ रोजी संगमनेर तालुक्याची ‘मिशन आरंभ’ कार्यशाळा जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झाली.शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ (इयत्ता पाचवी -आठवी) वर्ग शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला मार्गदर्शन करताना जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) भास्कर पाटील यांनी वरील उदगार काढले. नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे मिशन आरंभ या उपक्रमाची फलनिष्पत्ती आहे. राज्यभरात आपल्या उपक्रमाचे अनुकरण होत आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीचा पट वाढला आहे. सर्व शिक्षकांनी यशाचे हेच सातत्य कायम ठेवून अजूनही उत्तुंग यशाची भरारी घ्यायची आहे. त्यासाठी नियोजन, विश्लेषण,मेहनत व त्याग यांचा अवलंब करायचा आहे. असेही ते म्हणाले.
कार्यशाळेला संबोधित करताना ‘मिशन आरंभ’ उपक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी जयश्री कारले यांनी वर्षभराच्या नियोजनाची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल माहिती दिली. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांनी संगमनेर तालुक्याने यावर्षी नवोदय व शिष्यवृत्तीत मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले. या पुढील वर्षीही असेच उत्तम यश मिळवायचे आहे. यासाठी शिक्षकांना प्रेरित केले.
कार्यशाळेमध्ये नवोदय व जिल्हा शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थी व त्यांचे वर्ग शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. त्यात नवोदय पात्र ईश्वरी खिलारी, प्रसाद तोडकरी, यशश्री देशमुख,ओम बडे व ईश्वर सोनवणे हे विद्यार्थी. त्यांना मार्गदर्शन करणारे छाया गायकवाड, हरिभाऊ करकंडे, संगीता पाटोळे व पाराजी सोनवणे हे वर्गशिक्षक. तसेच जिल्हा शिष्यवृत्तीधारक प्रसाद तोरकडी, ईश्वरी देशमुख, यशश्री देशमुख, तपस्या कोरडे, तेजस जाधव, पूर्वा कडलग, आराध्या वाकचौरे,अनुश्री साबळे,ओम बडे, निलेश पवार,रिदीमा देशमुख, कार्तिक आठरे,ईश्वर सोनवणे हे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे हरिभाऊ करकंडे,संगीता पाटोळे,अशोक मधे, राजू आव्हाड व पाराजी सोनवणे या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानासाठी ट्रॉफी व सन्मानपत्र यासाठी योगदान शिक्षक नेते शिवाजी दुशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य संगमनेर प्राथमिक शिक्षक मित्र मंडळाने केले.
मागील वर्षी मिशन आरंभ अंतर्गत ज्या शिक्षकांनी ऑनलाईन तासिका घेतल्या त्यांचाही सन्मान यावेळी भास्कर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ऑनलाइन तासिकेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल तंत्रस्नेही शिक्षक संदीप पावसे व एम. एड पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केल्याबद्दल बाळासाहेब जाधव केंद्रप्रमुख देवगाव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यशाळा आयोजनाचे नियोजन तालुका शिष्यवृत्ती नोडल अधिकारी कल्याण राऊत यांनी केले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव केंद्रप्रमुख देवगाव व आभार प्रदर्शन बाळासाहेब जाधव केंद्रप्रमुख चंदनापुरी यांनी केले.
कार्यशाळेसाठी जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष डॉ. माणिकराव शेवाळे, प्राचार्य डांगे सर,शिक्षण विस्तार अधिकारी मंगला कलगुंडे,दत्तात्रय मैड,नंदा वलवे,श्रीम.ठोकळ मॅडम तर केंद्रप्रमुख सुनील नरसाळे,सुभाष राहणे,रविंद्र अनाप, विनायक भोसले,पार्वती गाडेकर,आशा घुले,कल्पना बिडवे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!