डॉक्टरेट मिळवून अंभोरेचा नावलौकिक वाढविला! सौ. माधुरी बिडगर यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पीएच.डी. पदवी बहाल

अंभोरे, / लोकवेध live न्यूज 

अंभोरे गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवणारी गौरवशाली बातमी! गावातील सुपुत्री आणि संगमनेर तालुक्यातील प्रेरणास्थान ठरणाऱ्या सौ. माधुरी संदीप बिडगर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून “कॉम्प्युटर इंजिनिअरिंग” या विषयात डॉक्टरेट (Ph.D.) पदवी बहाल करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सौ. माधुरी बिडगर या AlSSMS College of Engineering मध्ये मागील ८ वर्षांपासून प्राध्यापक पदावर कार्यरत असून, त्यांच्या पती प्रा. संदीप कोंडाजी बिडगर हे देखील त्याच महाविद्यालयात मागील २० वर्षांपासून यशस्वी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कठोर मेहनत, प्रामाणिकपणा, अभ्यासू वृत्ती आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांनी ही शैक्षणिक शिखर प्राप्त केले आहे.

त्यांचे शिक्षणातील यश हे केवळ वैयक्तिक नसून, त्यामध्ये त्यांचे सासरे मा.श्री.कोंडाजी सखाराम बिडगर (सेवानिवृत्त शिक्षक, अंभोरे), सासूबाई सौ. लता कोंडाजी बिडगर, तसेच आईवडील श्री. भगवंत थोरात (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, राहाता) व सौ. ताराबाई थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. यासोबतच दीर श्री. कपिल कोंडाजी बिडगर (मुख्य कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभाग), श्री. अमोल कोंडाजी बिडगर, आणि इतर कुटुंबीयांचे आधार व प्रेरणा मिळाल्यामुळेच त्यांना हे यश संपादन करता आले.

सौ. माधुरी यांच्या या यशामुळे अंभोरे गावाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठात तसेच महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर उजळून निघाले आहे. संगमनेर, अहिल्यानगर आणि पंचक्रोशीत त्यांच्या यशाचे कौतुक होत असून, हे यश अनेक युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री मा. श्री. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार श्री. सत्यजित तांबे, दुध संघाचे चेअरमन मा. श्री. रणजितसिंह देशमुख यांच्यासह अंभोरे गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी ग्रामस्थ, शिक्षकवृंद आणि युवा वर्गाने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


📝 हे यश म्हणजे अंभोरे गावाच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीचा उत्कृष्ट नमुना असून भविष्यातील विद्यार्थ्यांना नवे स्वप्न दाखवणारा प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!