ओझर खु येथे विविध कागदपत्रांचा शासकीय कॅम्प आयोजित करावा वीट भट्टी कामगार संघटनेची मागणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील ओझर खु
येथिल आदिवासींच्या तसेच विट भट्टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आदिवासी समाजाला विविध कागदपत्रांसाठी ओझर खुर्द येथे शासकीय कॅम्प आयोजित करावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार तसेच आमदार अमोल खताळ यांना देण्यात आले
ओझर खु. येथील शेकडो आदिवासी विटभट्टी कामगार कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास पुढाकार घेत आमदार अमोलजी खताळ यांनी “लवकरच विशेष कॅम्प उभारला जाईल” आणि “१००% लाभार्थ्यांना मदतीची हमी दिली जाईल”, असे ठोस आश्वासन दिले.
या निर्णयामुळे आदिवासी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. आजवर केवळ आश्वासनांवर जगत आलेल्या या कुटुंबांसाठी हा निर्णय म्हणजे त्यांच्या जीवनातील वळणबिंदू ठरणार आहे.
✅ कॅम्पसाठी प्रशासन स्तरावर हालचाली सुरू
या उपक्रमाल अधिकृत स्वरूप मिळावे यासाठी विटभट्टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा प्रमुख मा. दादासाहेब बुचूडे यांनी तहसील कार्यालयात भेट दिली. तहसीलदार धिरज मांजरे अनुपस्थित असल्यामुळे, नायब तहसीलदार कदम यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदन सादर करण्यात आले.
या बैठकीत कॅम्प लवकरात लवकर घेणे तसेच आदिवासी समाजाला विविध योजनांचा प्रत्यक्षात लाभ मिळावाअशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली. नायब तहसीलदार कदम यांनीही अत्यंत सकारात्मक भूमिका घेत, “प्रशासन तुमच्या पाठीशी आहे”, असा विश्वास दिला.
—
💬 संघटनेचे आभार आणि लोकांचा प्रतिसाद
या ठोस कृतीबद्दल विटभट्टी कामगार संघटनेचे जिल्हा प्रमुख मा. दादासाहेब बुचूडे यांनी आमदार अमोलजी खताळ, नायब तहसीलदार कदम आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले.
> “वर्षानुवर्षे विटभट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी कॅम्प आयोजित झाल्यास व त्यांना विविध कागदपत्रे उपलब्ध झाल्यास विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे
—
📌 आमदार खताळ यांची लोकाभिमुख भूमिका
आमदार खताळ हे नेहमीच सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तत्काळ त्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असतात याही वेळी त्यांनी केवळ आश्वासन न देता कॅम्प उभारणी, तसेच प्रशासनाशी समन्वय, साधून गरीब आदिवासी समाजाची सर्वच कामे मार्गी लावली जातील असे सांगितले
त्यांच्या या तत्परतेमुळे ओझर खु. परिसरातील आदिवासी समाजाला नक्किच सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळणार आहे.
🔍 पुढील वाटचाल कशी असेल?
ओझर खु. येथे लवकरच शासन मान्यतेचा विशेष कॅम्प भरवला जाणार आहे.
या कॅम्पमध्ये , उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड इ. कागदपत्रांची जागेवरच उपलब्धता केली जाणार आहे.
ओझर खु. येथे घडत असलेल्या या प्रक्रियेमुळे आदिवासी समाजाच्या जीवनात मोलाचा बदल घडून येणार आहे. शासनाच्या योजनांचा योग्य लाभ योग्य वेळी, गरजूंना मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र येऊन कार्य करणार आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
तर या वेळी स्थानिक आदिवासी समाजातील अनेक महिला, वृद्ध, युवक उपस्थित होते.
