कै. वसंतराव जगदाळे यांच्या दशक्रियाविधीस मा. रणजितसिंह देशमुख यांची उपस्थिती

कराड / लोकवेध live न्यूज 

महानंद दुध महासंघाचे मा. संचालक व कोयना तालुका सहकारी दुध संघाचे चेअरमन कै. वसंतराव जगदाळे यांच्या निधनाने सहकार चळवळ, दुग्ध व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्राला अपूरणीय हानी झाली आहे. त्यांच्या दशक्रियाविधी प्रसंगी महानंद दुध महासंघाचे मा. अध्यक्ष व संगमनेर तालुका सहकारी दुध संघाचे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख यांनी विशेष उपस्थित राहून कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली.

या वेळी श्री. देशमुख यांनी कै. जगदाळे यांच्या कार्याची आठवण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. “कै. वसंतराव हे सहकार चळवळीतील खरे सेनानी होते. दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी आयुष्यभर झटले. त्यांची कामगिरी, त्याग आणि दूरदृष्टी आजही अनेकांना प्रेरणा देत राहील,” असे देशमुख म्हणाले.

दशक्रियाविधीला विविध सहकारी संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या डोळ्यांत अश्रू होते तर मनात त्यांच्याबद्दलची आदरभावना ओसंडून वाहत होती. कै. जगदाळे यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचा आवाज बनून, प्रामाणिकपणे आणि नि:स्वार्थ भावनेने काम केले. त्यांची रिकामी जागा लवकर भरून निघणारी नाही, असे सर्वांनी नमूद केले.

समारोपाला उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. गाव, तालुका आणि संपूर्ण सहकार क्षेत्रात त्यांच्या कार्याची कायम स्मृती राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!