राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची सोनवणे परिवारास सात्वन भेट
संगमनेर / लोकवेध live न्यूज
राजहंस दूध संघाचे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख यांनी संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठित सोनवणे परिवारास भेट देत त्यांच्या मातोश्री कै. केसरबाई रामराव सोनवणे यांच्या निधनाबद्दल आपले गाढ दुःख व्यक्त केले. श्री. हौशिराम सोनवणे व श्री. योगेश सोनवणे यांच्या मातोश्रींच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या सात्वन भेटीदरम्यान देशमुख यांनी सोनवणे परिवाराला धीर देत म्हटले की, “कै. केसरबाई या कर्तृत्ववान आणि आदर्श माता होत्या. त्यांच्या स्मृती समाजसेवा आणि कुटुंबप्रेम या दोन्ही क्षेत्रांत प्रेरणादायी राहतील.”
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. रामनाथ कुटे, राजेंद्र देशमुख, गणेश पवार तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनीही या प्रसंगी उपस्थित राहून सोनवणे परिवाराच्या दुःखात सहभाग घेतला.
सोनवणे परिवार हे सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे म्हणून ओळखले जाते. कै. केसरबाई यांच्या निधनाने गावात एक प्रेमळ, संयमी व समाजहितैषी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना या वेळी सर्वांनी केली.
