चिंचोली गावातील जेष्ठ मातृशक्तीचे कौशाबाई दादा सोनवणे यांचे निधन; सर्वत्र हळहळ व्यक्त

संगमनेर (प्रतिनिधी) :–

तालुक्यातील चिंचोली गुरव गावच्या रहिवासी व आधार फाउंडेशनचे समन्वयक पी. डी. सोनवणे यांच्या मातोश्री श्रीमती कौशाबाई दादा सोनवणे (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्या स्वभावाने अतिशय मनमिळाऊ, धार्मिक वृत्तीच्या आणि सर्वांशी स्नेहाने वागणाऱ्या होत्या. आयुष्यभर त्यांनी साधेपणा, संयम आणि कष्ट यांचा आदर्श ठेवत परिवारात आपुलकीचे वातावरण निर्माण केले. गावातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत त्यांचा कायम सहभाग असायचा. त्यांच्या जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात सहा मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!