तेच ठेकेदार, तेच पुढारी’ या तालुक्यातील प्रवृत्तीला मोडून काढण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर कारवाईची पाऊलं उचलली तर तुम्हाला मिरच्या झोंबायचे कारण काय? असा परखड सवाल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा !
संगमनेर : लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
संपूर्ण तालुक्यात बेकायदेशीर वाळूचा उपसा, अवैध गौण खनिजांचे उत्खनन आणि स्वता:च्या नातेवाईकांसह बगलबच्चांना कामाचे ठेके देताना आपण कोणत्या पदाची आब राखली याचे उत्तर माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रथम द्यावे. ‘तेच ठेकेदार, तेच पुढारी’ या तालुक्यातील प्रवृत्तीला मोडून काढण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर कारवाईची पाऊलं उचलली तर तुम्हाला मिरच्या झोंबायचे कारण काय? असा परखड सावलही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार घेण्यासाठी संगमनेर मधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, अमोल खताळ, तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, अकोले तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, भाजयुमोचे शैलेश फटांगरे यावेळी उपस्थित होते.
जलजीवन मिशन हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या माध्यमातून 2024 पर्यंत ग्रामीण भागात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. या कामाची गुणवत्ता राखून ही योजना यशस्वी व्हावी यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंग पटेल हे शिर्डी लोकसभा मतदार संघाचा आढावा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने घेता आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी संगमनेर अकोले तालुक्यातील योजनांच्या सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते असे स्पष्ट करुन कोणत्या गावात या योजनेचे काम कशा पद्धतीने सुरु आहे याची पारदर्शकता अधिकारी, ठेकेदार आणि गावातील पदाधिकारी यांच्यासमोर एकत्रित यावी हाच या बैठकीमागील महत्वाचा हेतू होता. परंतू सकारात्मक झालेल्या बैठकीला कुणी दंडेलशाही म्हणत असेल, तर याचे आश्चर्य वाटते असे शहराध्यक्ष ऍ़ड.श्रीराम गणपुले यांनी म्हटले आहे. विकासाच्या गप्पा करणाऱ्यांना चिखली ते राजापूर या रस्या्यच्या तांत्रिक मंजूरीसाठी अजुनपर्यंत मागणी करावी लागते. 15 वर्षे मंत्रीपदावर राहून तुम्ही काय केले.? समन्यायी पाणी वाटपाच्या प्रश्नावर तुम्ही गप्प बसण्याची भूमिका घेतली. आज जुन्या पेंशनच्या नावाने ओरडत आहात. परंतू 2005 साली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळातच पेंशन बंद करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी तुम्ही त्यांच्या मंत्रीमंडळात होता या सोयीस्कर विसर तुम्हाला आता कसा पडला!
संगमनेर तालुक्यत मागील 10 ते 15 वर्षापासून ग्रामीण भागात ठेकेदारांनी राजकारण करण्याची परंपरा सुरु झाली आहे. इष्ठमित्र आणि नातेवाईकांना कंत्राटे मिळून देण्यासाठी मंत्रीपदाचा राजरोस वापर कुणी केला हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. परंतू आता या परंपरेला छेद देवून शिंदे-फडणवीस सरकारने गुणवत्तापूर्ण कामांना प्राधान्य दिल्याने व घेतलेल्या कामांना त्या ठेकेदाराला जबाबदार धरण्याची प्रथा या नव्या सरकारमध्ये सुरु झाल्यानेच मागील सहा महिन्यापासून पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीया योजनांच्या कामांचा दर्जा राखण्यासाठी व या योजना विहित कालावधीमध्ये पूर्ण होण्याच्या दृष्टीने काम सुरु केल्याचा पोटशुळ काहींना उठला आहे. त्यातूनच माजी महसुलमंत्र्यांचा उद्वेग आणि त्यातच झाकण उडेपर्यंत मानसिक संतुलन बिघडल्याची पस्थिती त्यांच्या विधानांतून दितस असल्याची टिका ऍ़ड. गणपूले यांनी केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री आब न राखता बैठका घेत असल्याच्या आरोपाची खिल्ली उडवून अमोल खताळ म्हणाले की, 10 ते 12 वर्ष तुम्ही मंत्रीपदावर होता. तेव्हा तालुक्यातील कोणत्या कामाची आब राखली गेली. तुम्हाला पालकमंत्र्यांवर टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तुमच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात अवैध वाळू उपसा, गौणखनिजांचे अवैध उत्खनन आणि नातेवाईक तसेच भावासह बगलबच्चांना ठेके दिले गेले. यासर्व बेकायदेशीर कृत्यांमुळेच या तालुक्यातील डोंगर पोखरुन खाल्ले गेले. नैसर्गिक संपत्तीचा नाश झाला. आज हरीत लवादाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी गेल्या आहेत. परंतू तुम्हाला क्रशर बंद पडल्याचे दु:ख असा टोला लगावून खताळ म्हणाले की, तुमच्या बगलबच्चांची दादागिरी, दडपशाही महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोडून काढल्यामुळेच वैफल्यग्रस्त माणसिकेतून तुम्ही आता त्यांच्यावर बेछूट आरोप करत आहात. परंतू तुमच्या आरोपांत कुठलीही नैतिकता राहिली नाही. आजही तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे ठेके हे तुमच्या बंधुंनीच घेतली आहे. त्याची यादी अजून बाहेर यायची आहे. एका ठराविक कंपनीलाच सातत्याने कामे कशी मिळतात हे येणाऱ्या काळात जनतेला सांगणारच आहोत. गावोगावी तुमच्या बगलबच्चांच्या झालेल्या बंदोबस्तामुळे तुमचा आता जळजळाट सुरु असलेल्याचे ते म्हणाले.
भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीष कानवडे यांनी जलजीवन मीशन योजनेकरीता जील्ह्याला 3 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, यापैकी संगमनेर तालुक्याला 761 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. तालुक्यातील यासर्व योजनांच्या कामांचा पाठपुरावा पालकमंत्री म्हणूनविखे पाटील यांना अधिकार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
आढावा बैठकीला स्थानिक आमदारांना बोलविले गेले नसल्याचा आ.थोरात यांचा आरोप खोडून काढताना, अमोल खताळ म्हणाले की इतक्या वर्षे तुम्ही मंत्री होता या तालुक्याशी संबंधित असलेल्या शेजारील तालुक्यातील विधानसभा मतदार संघातील कोणत्या लोकप्रतिनिधींना तुम्ही सन्मानाने बोलविले. मुळात तुम्ही बैठका घेतल्याच नाहीत आणि आता तुमच्या महसुल मंत्री पदाची कारकिर्द आणि मंत्री विखे पाटील यांची महसुल मंत्री पदाची आठ महिन्यांची कारकिर्द उभा महाराष्ट्र आता पाहात आहे.
