विज्ञानप्रदर्शनातून उद्याचे जबाबदार नागरिक तयार होतील…राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब

निमगाव जाळी / अशोक गोसावी 

शनिवार दि. 22 नोव्हेंबर रोजी पंडित नेहरू विद्यालय निमगाव जाळी येथे शालेय अंतर्गत गणित विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेचेआयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष गुलाबरावजी जोंधळे, कार्यकारी संचालक प्रा.दीपकभाऊ जोंधळे यांच्या मार्गदर्शना खाली व संस्थेचे कार्याध्यक्ष तथा सचिव दत्ताभाऊ जोंधळे यांच्या सहकार्याने आज गणित व विज्ञान प्रदर्शन पार पडले.
विद्यालयातील 100 विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय जिज्ञासूपणे आणि चिकित्सकपणे सुंदर उपक्रम सादर केले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडले.
रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौ. प्रतिभाताई जोंधळे व माजी चेअरमन ठकाजीराव थेटे पाटील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक व्यावहारिक कौशल्य पर्यावरण विषयक असलेली कुतुहल तसेच विज्ञान आणि गणिताची आवड निर्माण होऊन चिकित्सक वृत्तीचा उपयोग करून विज्ञान व गणिताची विविध उपकरणे तयार करण्याचा अनुभव त्यांना मिळावा व भविष्यात त्यांच्या शालेय शिक्षणानंतर व्यवहारीक जीवनामध्ये व्हावा यामधूनच उद्याचे विज्ञानजगातील एक चांगले आणि जबाबदार नागरिक तयार होतील असं आशावाद त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब गागरे यांनी केले.या कार्यक्रमास माजी सरपंच अमोल जोंधळे निमगावजाळीचे विद्यमान उपसरपंच सुरेशराव डेंगळे,ग्रा.पं. सदस्य दिलीप डेंगळे, रावसाहेब डेंगळे, रंगनाथ वदक, चंद्रभान वदक मामा, गंगाधर डेंगळे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे, मच्छिंद्र डेंगळे,तानाजी जोंधळे, भाऊसाहेब डेंगळे, सोमनाथ खरात,पालक व ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोंधळे जितेंद्र यांनी केले तर आभार खेमनर सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रताप जोंधळे , सातपुते सर,विज्ञान शिक्षक, शिक्षिकानी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!