देवगड देवस्थानचा ब वर्गात समावेश पाच कोटीचा निधी मिळणार-आ खताळ
आ अमोल खताळ यांच्या हस्तेदेवगड खंडोबा महाराजांची महाआरती
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणारे हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा देव स्थानला महायुती सरकारच्या माध्य मातून ब वर्ग दर्जा मिळाला आहे त्या माध्यमातून या मंदिर परिसराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे त्या निधीतून देवगड देवस्थान परिसराचा विकास होणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला
संगमनेर तालुक्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवर गाव पावसा येथील देवगड खंडोबा देवस्थान येथे चंपाषष्ठी उत्सवनिमित्त आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते खंडोबा महाराज यांची महाआरती ।करण्यात आली.या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, विश्वस्त काशिनाथ पावसे, उत्तमराव जाधव, मोठ्याभाऊ बडे, चंद्रशेखर गडाख, भाजप सरचिटणीस गणेश दवंगे, केशव दवंगे, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, सखाराम येरमल, सर्जेराव येरमल, दशरथ गडाख, देविदास कदम, गणेश पावशे, दादासाहेब गडाख, मच्छिंद्र गडाख, भारत गोफणे, सागर गोफणे, दीपक गुळवे, अशोक गोफणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते खंडोबा देवस्थान गडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणाऱ्या राजे उमाजी नाईक स्मारक बांधकामाचे भूमिपूजन तसेच हिवरगाव पावसा परिसरातील विजरोहित्राचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले
आमदार खताळ म्हणाले, संगमनेर तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील ज्या देवस्थानच्या सभा मंडपासाठी निधी मिळावा अशी मागणी केली त्यांच्या मागणीनुसार आमदार निधी तून सर्व देवस्थानच्या सभा मंडपा साठी निधी देण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न केला आहे त्यांच्या ४० वर्षाची आणि माझ्या एक वर्षाची तुलना आता जनता करू लागली आहे. एक वर्षाच्या कालावधीत तालुक्याच्या विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला आहे . जसे तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळेस माझ्या पाठीमागे भक्कम उभे राहिले असेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा महायुतीच्या पाठी मागे भक्कम उभे रहा असे आवाहन आमदार खताळ यांनी केले यावेळी खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
