श्रीक्षेत्र मालुंजे येथे ग्रामदैवत खंडोबा देवस्थान यात्रा उत्सवाची जय्यत तयारी
संगमनेर
श्रीक्षेत्र मालुंजे येथे सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत खंडोबा यात्रा उत्सवाची तयारी गावचे माजी सरपंच संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहे सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवाला यंदा उत्साहाचा भरभरून प्रतिसाद मिळत असून भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. भाविकांचे मनोभावे स्वागत करत या उत्सवाचे आयोजन आकर्षक कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पारंपरिक संस्कृती, लोककला आणि ग्रामीण खेळांची यामध्ये सांगड घालण्यात आली असून सर्व वयोगटांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली आहे.
उत्सवातील प्रमुख आकर्षण भव्य बैलगाडा शर्यत बुधवार दि. 01/04/2026 रोजी पार पडणार असून या शर्यतीसाठी परिसरातील शेकडो स्पर्धक तयारीत आहेत. त्यानंतर गुरुवार दि. 02/04/2026 रोजी भव्य काठी मिरवणूक भव्य दिमाखात काढण्यात येणार आहे. याच दिवशी रात्री लोकप्रिय अमृतवर्षा ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक रंगत आणणारा हा कार्यक्रम तरुणाईसह सर्वांच्याच उत्साहात भर घालणार आहे.
शुक्रवार दि. 03/04/2026 रोजी होणारा दुपारी चार वाजता भव्य कुस्ती आखाडा हा यात्रेचे आणखी एक मुख्य आकर्षण ठरणार असून नामांकित पैलवानांची उपस्थिती या आखाड्याची शान वाढवणार आहे.
खंडोबा यात्रेच्या निमित्ताने भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक विविधतेचा संगम असलेला हा यात्रा उत्सव सर्वांना आनंदाचा अविस्मरणीय अनुभव देणार आहे. तरी गावातील भाविकांनी या यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा असे आव्हान माजी सरपंच संदीप घुगे यांनी केले
