केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत टाकळी शाळेचा विजयघोष
विद्यार्थ्यांची चौफेर यशाची घोडदौड… तब्बल १४ पारितोषिके पटकावली

अकोले :-

जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती शिक्षण विभाग अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने गर्दणी येथे आयोजित सन २०२५-२६ मधील केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत टाकळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी कौशल्य, आत्मविश्वास आणि कलागुणांची चमक दाखवत दमदार अशी कामगिरी केली. विविध स्पर्धा प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करत तब्बल १४ पारितोषिके पटकावत टाकळी शाळेने यशाचा नवा इतिहास रचला आहे.

या स्पर्धांचे उद्घाटन गर्दणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. साधनाताई अभंग व देवठाण बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

टाकळी शाळेतील गुणवंत विद्यार्थी व विजेत्या संघांनी मिळवलेली पारितोषिके पुढीलप्रमाणे—

गटगायन आणि नृत्य विभागात दैदिप्यमान यश :
१) समूहगीत गायन (लहान गट) – प्रथम क्रमांक
२) समूहगीत गायन (मोठा गट) – प्रथम क्रमांक
३) नृत्य नाटिका आदिवासी गीत (मोठा गट) – द्वितीय क्रमांक

वकृत्व, हस्ताक्षर, गोष्ट-सादरीकरण या प्रकारातही चमकदार कामगिरी :
४) प्राची संदीप गायकवाड – वकृत्व (किशोर गट) – द्वितीय क्रमांक
५) आरोही रोहित डावखर – वकृत्व (कुमार गट) – द्वितीय क्रमांक
६) ईश्वरी भाऊसाहेब पवार – गोष्ट सादरीकरण (किशोर गट) – द्वितीय क्रमांक
७) आराध्या राहुल बांबळे – हस्ताक्षर (किशोर गट) – द्वितीय क्रमांक
८) निकिता राहुल बांबळे – हस्ताक्षर (कुमार गट) – द्वितीय क्रमांक
९) समर्थ श्रावण पवार – वकृत्व (किलबिल गट) – द्वितीय क्रमांक
१०) अस्मिता कान्हा गांगड – वेशभूषा सादरीकरण (कुमार गट) – द्वितीय क्रमांक
११) श्रेयाली श्रावण पवार – वैयक्तिक गीतगायन (किशोर गट) – द्वितीय क्रमांक
१२) स्नेहा विनायक भोजने – वैयक्तिक गीतगायन (कुमार गट) – द्वितीय क्रमांक
१३) रूस्तम भाऊसाहेब पवार – वेशभूषा सादरीकरण (किशोर गट) – द्वितीय क्रमांक
१४) दिया बाळू शिळकंदे – गोष्ट/कथा सादरीकरण (कुमार गट) – द्वितीय क्रमांक

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार, शिक्षक संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे, संगिता धिंदळे, कैलास झोळेकर यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करण्यात आले.

अकोले तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख बाळासाहेब आरोटे, रोहिणी खतोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब फोडसे, डॉ. जनार्दन मोरे, सरपंच दत्तुभाऊ गरूड, निलेश भरीतकर, पंकज शेवाळे, राहुल घोलप तसेच पालक व ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

टाकळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ शाळेचा गौरव वाढवणारे नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील अपार कला-सामर्थ्याची जाणीव करून देणारे आहे. पुढील स्पर्धांमध्येही हीच यशस्वी परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!