बीड जिल्ह्याच्या हॉलीबॉल संघाची राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

अंबाजोगाई / सुरेश मंत्री

शिक्षक व अधिकारी/कर्मचारी क्रीडा स्पर्धेअंतर्गत दि. १२ डिसेंबर शुक्रवार रोजी वसूसायगाव, ता.गंगापूर जिल्हा छ. संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला असून या संघाची राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बीड जिल्ह्याच्या हॉलीबॉल संघाचे कॅप्टन गोविंद कांदे, हनुमंत आपेट, प्रशांत राजभोज, मोहन ढाकणे, श्रीमती प्रियंका गित्ते, श्रीमती कविता कांदे, श्रीमती अनुराधा दंतुलवाड, श्रीमती संजीवनी नागरगोजे, आशोक बादाडे, गोविंद सुर्यवंशी या खेळाडूंनी हॉलीबॉल खेळातील नैपूण्य दाखविले. या यशाबद्दल विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ, प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक शैलेजा दराडे, डाएट चे प्राचार्य राजेंद्र कांबळे, म.रा.मा व उ.मा.शिक्षण मंडळ विभागीय अध्यक्ष अनिल साबळे, एमआयइपीएचे संचालक प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, क्रिडा स्पर्धांचे नियोजक क्रिडा शिक्षक गर्जे तसेच अंबाजोगाई डाएट च्या प्रा. प्रतिभा देशपांडे, परळीचे गट शिक्षणाधिकारी गणेश गिरी, परळीचे केंद्रप्रमुख प्रदिप चाटे यांनी विजेत्या संघाचे कौतूक व अभिनंदन केले व पूढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!