तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना समिती बरखास्त करा
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पा यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
संगमनेर प्रतिनिधी

भोजापूर चारीच्या माध्यमातून तळेगाव पाणी पुरवठा योजनेला मदत करण्याबबात आपण निश्चित सकारात्मक विचार करणार आहे. मात्र अनेक वर्षे कार्यरत असलेली 17 गाव तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समिती ताताडीने बरखास्त करून तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी समितीचा आढावा घेवून समिती नव्याने गठीत करण्याबाबतच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावात सुमारे ४ कोटी ५८ लाख रुपयांच्या तसेच तळेगाव येथील १कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.आ.अमोल खताळ जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे भाजपाचे भीमराज चतर शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे सरपंच शशिकला पवार तळेगावच्या सरपंच उषा दिघे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
तळेगाव पाणी पुरवठा योजनेच्या प्रश्नाचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की वर्षानुवर्ष तीच माणस पाणी पुरवठा समितीत राहील्याने समितीच्या कामाचा कोणालाही अंदाज येत नाही.त्यामुळेच सिमिती बरखास्त करून त्यामध्ये सर्व गावांचे ग्रामसेवक घेवून दर महीन्याला समितीच्या कामाचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
राज्यातील महायुतीचे सरकार जनतेसाठी काम करीत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने निर्णय घेतले जात आहे.भोजापुर चारीच्या कामासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यात या पाण्याचा उपयोग तळेगाव पाणी पुरवठा योजनेला कसा करून देता येईल याबाबत अधिकार्यांनी प्रस्ताव तयार करावा असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.मालदाडच्या पाणी पुरवठा योजनेला तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
चौकट
, महायुतीच्या माध्यामातून चांगले काम सुरू आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १७कोटी रुपयांच्या रस्ते कामाला मिळाल्याने मालदाड गाव हमरस्त्यावर आले आहे. जवळे कडलग येथे चाळीस वर्षे रस्ता नव्हता म्हणून सिध्देश कडलगला प्राण गमवावे लागले.काल त्या रसत्याच्या कामाला सुरूवात झाली.दोन सरकार मधील हा फरक असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
वोट चोरीचे आरोप करणार्यांना बिहार मध्ये सहा जागा मिळाल्या.महायुती सरकारच्या योजना बंद पाडण्यासाठी हीच मंडळी कोर्टात गेले.लोकांचे यांना काही देणेघेणे नाही.प्रत्येक समाजघटकाच्या मागे महायुती सरकार उभे आहे.सौर उर्जा प्रकल्पाच्या माध्यामातून दिवसा वीज देण्याचे काम होत आहे.सोलर स्ट्रीट रस्ता करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देणार असल्याचे मंत्री विखे म्हणाले.
एक वर्षाच्या कार्यकाळात महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.निधी महायुती सरकारचा असतो पण श्रेय घ्यायला वेगळेच माणस पुढे असताता.याचा विचार जनतेने करावा.नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव खुल्या दिलाने आम्ही स्विकारला.मात्र विजय कसा मिळाला हे जनतेला सुध्दा माहीत आहे
श्री अमोल खताळ पाटील
आमदार संगमनेर विधानसभा
निळवंडे कालव्यावरील रस्त्याच्या कामाला २कोटी ९लाख रुपये तसेच निळवंडे दोन डाव्या कालव्यावरील १०लोखंडी पुलासाठी १कोटी १३लाख यासह तळेगाव येथील पाणी पुरवठा तलावा करीता ४लाख तळेगाव चौकाच्या सुशोभीकरण कामासाठी ९लाख रुपये तसेच अन्य सामाजिक उपक्रमासाठी महायुती सरकारने मंजूर केले असल्याचे आमदार अमोल.खताळ यांनी सांगितले
