कला-संस्कृतीचा उत्सव साजरा – प. पू. गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पिंपरणे :

येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साही व सांस्कृतिक वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, सदस्य श्री. डी. एम. देशमुख, सुरेश ठोंबरे, सचिव कैलास काळे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष के. सी. बागुल सर, उपाध्यक्ष विलास साळवे सर यांच्या शुभहस्ते प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांची आरती संपन्न झाली.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आरती, पोवाडा, भांगडा, लावणी, जोगवा फ्युजन, नाटिका, एकांकिका, किर्तन, वेस्टर्न डान्स तसेच विविध लोकनृत्यांनी कार्यक्रम रंगतदार झाला. विविध वेषभूषा व केशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धात्मक सादरीकरणात पाचवी ते सातवीच्या लहान गटात इयत्ता ५ वी ‘ब’च्या विद्यार्थिनी उन्नती संतोष राहिज, साईश्वरी सतीश जगताप, आरोही योगेश शिंदे व ग्रुप यांनी सादर केलेल्या “मोबाईल मोबाईल” या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. आठवी ते दहावी गटात इयत्ता दहावी व नववीतील विद्यार्थिनी गोजिरी गोरे व ग्रुप यांच्या “चिमणी माझी उडून गेली” या नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. अकरावी-बारावी गटात इयत्ता ११ वी सायन्सच्या वृषाली गिरी व ग्रुप यांनी सादर केलेल्या ‘जोगवा’ नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला, अशी माहिती सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती हासे एम. व श्री. रूपनर सर यांनी दिली.
कार्यक्रमाचे परीक्षण श्रीमती ढोमसे के. जे. व सौ. मांढरे आर. बी. यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रावणी दिपक कोटकर हिने केले.
या स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी श्री. शेख ए. के., भीम रघुवंशी एन. व्ही., श्री. रोकडे टी. डी., मी. गाणे व्ही. बी., भी. विरकर ई. एस., जी. शेळके एल. व्ही., श्रीम. सांगळे डी. एस., श्रीम. गोसावी ए. वाय., श्रीम. मुटकुळे एम. बी., श्रीम. वर्षे एस. बी., श्रीम. सवार एस. एस., श्री. धिंदळे बी. एन., बी. डोंगरे डी. के., श्री. चांडे पी. एस., बी. जोंधळे अविनाश, श्रीम. कुटे हाली, श्रीम. भोसले अंकिता, सौ. थोरात स्वाती बाळासाहेब, श्रीमती ओटी शुभांगी, घीमती शिंदे एम. डी., मांढरे राजश्री, रूपाली हासे, गणेश दातीर, प्रवीण दिघे, बाळासाहेब थोरात, चैतन्य भडकवाड, दत्तात्रय ठोसर, अमोल शेपाळ, स्वाती थोरात आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे वार्षिक स्नेहसंमेलन उपस्थित पालक, शिक्षक व ग्रामस्थांच्या स्मरणात राहणारे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!