“खरा विद्यार्थी खेड्यातच घडतो” —प्रदीप वट्टमवार यांचे मार्गदर्शन
पिंपरणे येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
पिंपरणे (प्रतिनिधी) :
माणसाची खरी ओळख ही ज्ञानावरून होते. बालपणापासून मैदानी खेळ खेळले पाहिजेत, मोबाईलपासून दूर राहावे, पाठांतरापेक्षा आकलनावर भर द्यावा. आपली खरी प्रगती ही मातृभाषेतच होते. सर्वांगीण विकासासाठी शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे तसेच भरपूर पुस्तके वाचनाची सवय लावावी, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
“खरा विद्यार्थी खेड्यातच बहतो” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ, संगमनेर येथील वरिष्ठ अभियंता श्री. प्रदीप वट्टमवार यांनी केले. पिंपरणे येथील प. पू. गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब देशमुख होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव श्री. कैलास काळे, संचालक श्री. सुरेश ठोंबरे, श्री. सुभाष पवार, केसी बागुल सर माजी मुख्याध्यापक मुकुंद डांगे सर श्री. विलास साळवे तसेच पंचक्रोशीतील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा चढता आलेख विशद करत विद्यार्थ्यांना सातत्याने परिश्रम करण्याचे आवाहन केले. शाळा समितीचे अध्यक्ष श्री. के. सी. बागुल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. मुकुंद डांगे यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाळे आर. बी. यांनी केले. त्यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी जि. प. प्राथमिक शाळा पिंपरणेचे मुख्याध्यापक श्री. संजय बोरसे, जि. प. प्राथमिक शाळेच्या श्रीमती दिपाली रेपाळ, जि. प. प्राथमिक शाळा कारवाडीचे श्री. मोमीन सर, जि. प. प्राथमिक शाळा रोहमवस्तीच्या श्रीमती बेलोटे, जि. प. प्राथमिक शाळा अंभोरेचे श्री. बेलोटे सर तसेच माध्यमिक विद्यालय डिग्रसचे मुख्याध्यापक श्री. बाचकर सर यांच्या शुभहस्ते विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक श्री. शेळके एल. व्ही. यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. डोंगरे डी. के. यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.
