“कोळवाडे गावात भक्तीचा सोहळा — बुधवारपासून श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाची  जय्यत तयारी 

कोळवाडे (ता. संगमनेर) —

प्राचीन भक्ती आणि पारंपरिक उत्साह यांचा मिलाफ असलेला श्री भैरवनाथ यात्रा उत्सव २०२६ कोळवाडे येथे मोठ्या श्रद्धाभावात साजरा होत आहे. शतकानुशतके गावाचे रक्षणकर्ते मानले जाणारे श्री क्षेत्र भैरवनाथ हे कोळवाडे ग्रामस्थांचे ग्रामदैवत असून, संकटसमयी रक्षक आणि न्यायकारी देवता म्हणून त्यांची ख्याती आहे. गावात भैरवनाथांच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भक्तांची गर्दी उसळते.

यंदाच्या उत्सवाला बुधवार दि. ०१ एप्रिल २०२६ पासून सुरुवात होणार असून सकाळी काठी सजवणे व इतर पारंपरिक विधी पार पडणार आहेत. सकाळी ७ ते १० या वेळेत धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी २ ते ६ दरम्यान काठी व छबिनाची भव्य मिरवणूक उत्साहात निघणार आहे. रात्री ९ ते १२ या वेळेत मनिषा सिद्धटेकर व रेश्मा नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे.

गुरुवार दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी मनिषा सिद्धटेकर व रेश्मा नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा हजेरी कार्यक्रम या  कार्यक्रमानंतर दुपारी ३ ते ६ यावेळेत रंगणारा जंगी कुस्ती हगामा हा विशेष आकर्षण ठरणार आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सामूहिक भंडारा, तर रात्री ९ ते १२ जागर गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा अनोखा जल्लोष अनुभवण्यासाठी भैरवनाथ यात्रा उत्सवाला परिसरातील सर्व भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून, भैरवनाथ यात्रा कमिटी च्या  वतीने स्नेहपूर्णवक  निमंत्रण देण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!