*गगनगिरी या नावातच सामर्थ्य आणि व्यापकता दडलेली :- उल्हासगिरी महाराज*

संगमनेर 

पहिल्या दिवसाच्या मंगलमय कार्यक्रमात उल्हासगिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वामीऔं गगनगिरी महाराजांच्या अलौकिक कार्याचा गौरव केला. यावेळी नातू संजय पाटणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गगनगिरी या नावातच सामर्थ्य आणि व्यापकता दडलेली आहे. ‘गगन’ म्हणजे आकाश आणि ‘गिरी’ म्हणजे पर्वत. आकाशाच्या व्यापकतेप्रमाणे आणि पर्वताच्या स्थैर्याप्रमाणे महाराजांचे व्यक्तिमत्त्व होते. गिरीकंदरांत राहून त्यांनी कठोर तपश्चर्या केली. आकाशाची व्याप्ती जशी मोजता येत नाही, त्याचप्रमाणे महाराजांचे कार्य आणि त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्यही अनंत आहे. भक्तांना ते विविध रूपांत अनुभवास येतात. या संपूर्ण ब्रह्मांडाची सत्ता त्या परमशक्तीचीच आहे. स्वामी गगनगिरी महाराजांनी पाण्यात उभे राहून केलेली तपश्चर्या अद्वितीय असून असा गुरु विरळाच जन्माला येतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या कालज्ञान ग्रंथाचा उल्लेख करताना महाराजांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे वर्णन करण्यात आले. स्वामी गगनगिरी महाराज चौसष्ट कला, सहा शास्त्रांचे ज्ञाता आणि त्रिकालदर्शी होते. मानवी जीवनाचा खरा उलगडा, आत्मज्ञानाचा मार्ग आणि अध्यात्माचे सार केवळ सद्गुरूच दाखवू शकतात, असे सांगत त्यांनी गुरुसेवा, नामस्मरण आणि श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित केले.
चौकट
तालुका सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी मंगल प्रार्थना
परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सप्ताह सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. सरपंच प्रमोद गुंजाळ यांनी सप्ताहाची रूपरेषा मांडली. गगनगिरी महाराज प्रतिष्ठानचे संजय पाटणकर तसेच, आबासाहेब थोरात, दिलीप शिंदे या दाम्पत्याच्या हस्ते पूजन करण्यात आले. सोमवार दिनांक 8 रोजी अधिक मासानिमित्त आठव्या पर्वातील पहिल्या दिवसाचा राम कथेचा प्रारंभ होत आहे. आपला तालुका पंचक्रोशी सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी मंगल प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!