शेतकरी तरुणाशी लग्न करायला मुली तयारच होईनात, सरपंचाने लढवली शक्कल; जाहीर केली अशी भन्नाट योजना !
शेतकरी अर्धांगिनी योजना!
दरेवाडी गावचे सरपंच आनंदा दरगुडे यांची अनोखी युक्ती
संगमनेर/ अण्णासाहेब काळे
शेतकरी हा जगाचा पोशिंदा, अन्नदाता अशा भारी भक्कम शब्दांत आपण सगळेच शेतकन्यांचे कौतुक करतो. परंतु त्याच शेतकऱ्याशी जेव्हा बेटी व्यवहार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुमचा मुलगा काय करतो ? शेती मग मात्र त्याच्याशी बेटी व्यवहार करायला मात्र सपशेल नकार मिळतो. ही समस्या महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच गावांत कमीअधिक प्रमाणात गंभीर स्वरुप धारण करू लागली आहे. यावर तोडगा म्हणून संगमनेर तालुक्यातील एका सरपंचाने शक्कल लढवली आणि एक भन्नाट योजना जाहीर केली आहे. सध्या ही योजना चांगलीच चर्चेत आहे.

काय आहे ही योजना
दरेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदा दरगुडे यांनी एक अनोखी युक्ती लढवली आहे जी मुलगी गावातील शेतकर्याच्या मुलाशी विवाह करेल त्या मुलीस रोख रक्कम ५५५५ रूपये व संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात येणार असून शेतकरी अर्धांगिनी असे या योजनेचे नावही ठेवले आहे.
दरेवाडी गावची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार जवळपास १ हजार १२ असून त्यात मात्र आता वाढ झाली आहे. गावातील अनेक तरूण उच्चशिक्षित झाले आहे मात्र नोकरीच्या पाठीमागे न जाता ते आज चांगल्या पद्धतीने शेती करत आहे. मात्र त्यांचे विवाह सुद्धा होत नाही कारण मुलीकडचे पाहुणे म्हणतात की मुलगा काय करतो शेती करतो असे सांगीतल्यावर की कुणी मुलगीही देत नाही म्हणून आज जवळपास गावातील पन्नास ते पंच्चावन मुलांचे विवाह झाले. नाही गावातील मुलांचे विवाह व्हावे म्हणून गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदा दरगुडे यांनी एक युक्ती लढवली आहे.मुलांचे विवाह व्हावे म्हणून जी मुलगी दरेवाडी गावातील तरूणाशी विवाह करेल त्या मुलीला रोख रक्कम ५५५५ रूपये व संसारोपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे सरपंच आनंदा दरगुडे यांनी “शेतकरी अर्धांगिंनी योजना” असे नावही या योजनेला दिले आहे.विशेष बाब म्हणजे सरपंच यांनी स्वत्ता ही योजना सुरू केली असून तेच रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य देणार आहेत.यासाठी त्यांना उपसरपंच,सदस्य, ग्रामसेवक यासर्वांचेही सहकार्य लाभले आहे.तर सरपंच आनंदा दरगुडे यांचेही सर्वांनी कौतुक केले आहे.तर शेतकरी अर्धांगिनी अशा पद्धतीची योजना राबवणारे हे पहिले सरपंच असल्याचे काहींनी सांगितले आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे आपन म्हणतो मात्र शेतकर्यांच्या मुलांना मुली देण्यास का? टाळाटाळ करतात त्यामुळे.मी एक युक्ती लढवली शेतकरी अर्धांगिनी ही योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून दरेवाडी गावातील शेतकर्यांच्या मुलाबरोबर जी मुलगी विवाह करेल त्या मुलीस रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य भेट देणार आहे. त्यामुळे त्या कुटुंबाला थोडाफार तरी हातभार लागणार आहे.– आनंदा दरगुडे ( सरपंच दरेवाडी ता.संगमनेर)
