अंभोरेत बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहाच्या वातावरणात संपन्न..

महाराष्ट्रातिल अनेक नामांकीत मल्लांनी हजेरी लावली होती.हगाम्याचे या वर्षी मुख्ख्य आकर्षण महिला मल्ल कुमारी गायत्री थोरात बाभळेश्वर हे ठरले

संगमनेर : लोकवेध live न्यूज 

 

अंभोरे ता.संगमनेर येथिल ग्रामदैवत बिरोबा महाराजांची यात्रा शुक्रवार दि.14 /04/2023 रोजी दुपारी 5वा. बिरोबा देवाची काठीची सजावट करुन डी जे,ढोल ताशाच्या गजरात फटांक्याच्या आतिशबाजी, गुलालाची उधळण करित सवाद्य मिरवणूक काढून काठी बिरोबा मंदिरात पोहचविण्यात आली.बिरोबा महाराजांना नैवद्य दाखविण्यात आला.शेरनीचे वाटप करण्यात आले. बिरोबा मंदीर व मंदीराबाहेर ,गावात विद्युत रोषणाई करण्यात आली.बिरोबा भक्त श्री.देवराम पाराजी खेमनर यांनी विधिवत पुजा केली. तसेच मंदीर सजावट त्यांनी केली. शुक्रवार रात्री 8 वा.शोभेची दारु उडविण्यात आली.शोभेची दारु,फटाके ही यात्रेचे मुख्ख्य आकर्षण ठरले. मनोरंजनासाठी महाराष्ट्रातील नामांकीत लावणी सम्राज्ञी,संगीताची राणी दिपाली सुरेखा पुणेकर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शनिवार दि.15/04/2023 रोजी दुपारी जंगी हंगामा करण्यात आला.महाराष्ट्रातिल अनेक नामांकीत मल्लांनी हजेरी लावली होती.हगाम्याचे या वर्षी मुख्ख्य आकर्षण महिला मल्ल कुमारी गायत्री थोरात बाभळेश्वर हे ठरले .महिला मल्ल कुमारी गायत्री थोरात हिस कुस्ती करण्यासाठी जोड न मिळाल्याने तिचा सन्मान करत इनाम देण्यात आला.अतिशय जोशपुर्ण उत्साहात कुस्त्या पार पडल्या.जवळपास एक लाख रुपयांचा बक्षिसांची खैरात करण्यात आली.शेवटची मानाची कुस्ती नारायणगिरी महाराज सहकारी दुध संस्था अंभोरे यांच्या वतीने सन्माननीय विजयसिंह उर्फ बाळासाहेब देशमुख साहेब अंभोरकर याच्या हस्ते 2100 रुपयांची लावण्यात आली. अतिशय मोठ्या उत्साहात यावर्षीची यात्रा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.कोरोना नंतर प्रथमच यावर्षीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली.त्यामूळे ग्रामस्थ,महिला,युवक यांच्यामध्ये उत्साह दिसत होता.अनेक ह लवाई ,खेळणीची,कटलरि,श्रीफळ, आइस्क्रिम ,पाणीपुरी,मिठाईची ,पेढे,फळांची, खाद्य पदार्थ,महिला,मुलींसाठी आकर्षक ज्वेलरीची दुकाने थाटली होती.दोन दिवस यात्रा असल्याने अनेक बाहेर गावचे आलेले पाहुणे यामुळे यात्रेत गर्दीने उच्चांक केला यात्रेतील मार्गावर महिला,पुरुष,युवक,मुलिंनी यांच्या अफाट गर्दीने यात्रा अगदी ओसंडून दिसत होती.वर्षातील यात्रा असल्याने अनेक ग्रामस्थ अपल्या कुटंबासह रोजगारासाठी बाहेरगावी तसेच नोकरीसाठी बाहेरगावी असलेले ग्रामस्थ आपल्या मुळ गावी बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी आले होते त्यांनीही आपल्या ग्रामदैवत बिरोबा महाराजांचे दर्शन घेउन आपल्या मुलाबाळांसह यात्रेचा आनंद घेतला.यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली त्यामूळे यात्रेत आलेले व्यवसायिक,दुकांनदार यांच्या चेह-या वर आंनद दिसत होता.

यात्रा यशस्वी करण्यासाठी संगमनेर तालुका सहकरी दुध उत्पादक संघाचे चेअरमन सन्माननीय रणजितसिंह देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली.मा.सरपंच श्री.भास्करराव खेमनर,सरपंच सौ.सुरेखाताई भाऊसाहेब खेमनर,उपसरपंच श्री.किसनराव खेमनर,सोसायटी चेअरमन श्री.रावजी भागा खेमनर,व्हाईस चेअरमन श्री.वाल्मिक खेमनर,नारायणगिरी सहकारी दुध संस्थेचे चेअरमन सन्माननीय विजयसिंह देशमुख उर्फ बाळासाहेब अंभोरकरसाहेब,व्हाईस चेअमन श्री.तुळशीराम मलगुंडे,ग्रामपंचायत सदस्य श्री.भाऊसाहेब खेमनर,प्रा.नारायण खेमनर,जेष्ठ कार्यकर्ते ग्रामपंचायत सर्व सदस्य,सोसायटी सदस्य,दुध संस्था सदस्य,श्री.सहादु दामू खेमनर,श्री.लहाणु भिमाजी खेमनर,श्री सोपान राधू खेमनर,श्री.विठोबा नामदेव खेमनर,श्री.सोपान काशिनाथ खेमनर,श्री.भाऊसाहेब वाघमोडे,श्री.रमेशराव खेमनर,श्री.अहिलाजी जगनर,श्री.बाबुराव जगनर,श्री.बबन सुभा खेमनर,भाऊसाहेब दगडु खेमनर,श्री.दत्तुपाटील खेमनर,श्री.विठोबा कारभारी खेमनर,श्री.सुभाषराव हळ्नोर,श्री.रभाजी खेमनर,यात्रा कमेटी, संगमनेर तालुका पोलिस स्टेशन ,पोलिस निरिक्षक,उपनिरीक्षक,पोलिस कॉन्सटेबल श्री.सय्यद,उगले यांनी चोख बंदोबस ठेवला. मा.आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते,मा.रणजितदादा देशमुख मित्र मंडळाचे कार्यकर्ते,स्थानिक संस्थाचे सर्व पदाधिकारी तरुण युवकांचे विशेष सहकार्य मिळाले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!