डिग्रस येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील डिग्रस  येथील संघर्ष तरुण मित्र मंडळ भालेराव वस्ती ( सीतामाईवाडी)  या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी वैचारिक जयंती उत्साहात साजरी करण्यांत आली .
 मागदर्शक भन्ते करुणानंद बोधी (नालंदा आश्रय कोंची ता .संगमनेर ) यांच्या धम्मवंदनेन कार्यक्रमांची सुरुवात झाली
संध्याकाळी ७ . ०० वा महाराष्ट्रांतील प्रसिद्ध गीतकार लेखक कवी जय शिवराय या गीताचे गायक, समता सैनिक दल संगमनेर चे संपादक प्रा. संतोष भालेराव  (चंदनापुरी ता संगमनेर ) यांच्या व्याख्यानाने शिवराय ते भीमराव या विषयावर सर्वांना मंत्रमुग्ध केले .
सर्वांनी आनंदाने  स्नेहभोजन  घेऊन
  शोभेची फटाक्यांची आतिषबाजी करून व डि.जे  च्या तालावर महापुरुषांच्या गीतावर नाचण्यांचा आनंद घेऊन आनंदाने व खेळीमेळीच्या वातावरणात जयंती उत्सव पार पाडला.
 कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संघर्ष तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!