MH 51 संगमनेरवासियांसाठी आता हिरमोड करणारा ठरला ; आता MH 51 इचलकरंजी
संगमनेर : लोकवेध live न्यूज
रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून आरटीओ कोड (सांकेतिक कोड) RTO असलेल्या प्रत्येक कार्यालयाला देण्यात आलेला आहे. अद्याप पावेतो 51 हा सांकेतिक कोड संगमनेर शहराला मिळाला असल्याची कल्पित जनभावना किंबहुना
लोकघोषित भावना होती, परंतु एम एच 51 हा कोड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून इचलकरंजी या शहराला शहराला देण्यात आला.
इचलकरंजी शहरात लवकरच परिवहन खाते सुरू होणार आहे. यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. खरे तर एम एच 51 या सांकेतिक कोड गूगलवर सर्च केले असता एम एच 51 संगमनेर शहारासाठी सांकेतिक कोड देण्यात आलेला आजही आपणास पाहावयास मिळतो, परंतु तो
संगमनेरवासियांसाठी आता हिरमोड करणारा ठरला आहे. RTO डेटाबेसमध्ये भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे तपशील समाविष्ट आहेत. संगमनेर शहरीकरणाचा वाढता व्याप तद्वतच गेली अनेक वर्षापासून संगमनेर जिल्हा व्हावा या मागणीसाठी संगमनेरकर पुढाकार घेत आहे.
भविष्यात संगमनेर येथे आरटीओ कार्यालय होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी येथील नागरिकांची रास्त मागणी आहे. महाराष्ट्राचा RTO कोड पहिले दोन अक्षर MH राज्याशी संबंधित आहे आणि शेवटचे 2 अंक शहराशी संबंधित आहे. इचलकरंजी हे वस्त्रोद्योगासाठी तर संगमनेरनगरी हे सहकारासाठी प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून
इचलकरंजी महापालिका म्हणून दर्जा मिळाल्यानंतर आता एम एच 51 पासिंग साठी मंजुरी मिळाली आहे. परिवहन खात्याकडून एम एच 51 ची मंजुरी मिळाली असून इचलकरंजी शहरात लवकर परिवहन खाते सुरू होण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांचे प्रयत्न सफल झाले आहेत. या संदर्भातील जीआरही जारी करण्यात आला असून 10 जून पर्यंत हे कार्यालय सुरू होणार असल्याचेही अधिकृत सूत्राकडून समजते.
