संगमनेर बस स्थानकातील वाढत्याचोऱ्या रोखण्यासाठी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक
संगमनेरशहर पो नि भगवान मथुरे झाले खडबडून जागे
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
संगमनेर बसस्थानकावरील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी तात्कालीन पोलीस उपाधीक्षकांनी सुरू केलेल्या पोलीस चौकीत पोलीस थांबत नसल्याने पोलीस चौकीच बनली शोभेचा बहुला अशा अशा याचे वृत्त लोक वेध live न्यूज मध्ये प्रकाशित होताच शहराचे पो नि भगवान मथुरे हे खडबडून जागे झाले त्यांनी त्या बसस्थानकातील पोलीस चौकीसाठी दोघा पोलीस कर्मचार्यांसह एका होमगार्डची नियुक्ती केली आहे आणि प्रत्येक तासाला साध्या वेशातील पोलिसांची गस्त ही सुरु केली आहे त्यामुळे बसस्थानकाच्या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या महिला प्रवासी वर्गाचे दागिने ओबडण्याचे तसेच पुरुष प्रवाशांचे पाकीटमारीचे प्रमाण कमी होऊन वाढत्या चोऱ्यांना पायबंध घालण्यास नक्कीच मदत होणार आहे
संपूर्ण नगर जिल्ह्यात सर्वात मोठे आणि विस्तृत असे बस स्थानक संगमनेर येथे साकारले आहेत या बसस्थानकामध्ये पुणे नाशिक नगर छत्रपती संभाजी नगर मुंबई या महत्त्वाच्या शहरात जाण्यायेण्या साठी अनेक प्रवासी संगमनेर बस स्थान कात येत असतात तसेच तालुक्याच्या ग्रामीणभागात सुद्धा याच बसस्थानकातून बस जात येत असतात त्यामुळे या बस स्थानकामध्ये कायमच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते याच गर्दीचा फायदा उचलत तसेच बस स्थानकावरील असणाऱ्या पोलीस चौकीमध्ये पोलीसच नसल्यामुळे अनेक सोनसाखळी चोर व पाकीटमार करणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडणे तसेच पुरुष प्रवाशांची पाकिटे मारण्याची संधी साधत असतात यावर पोलिसांचा वचक नसल्या मुळे त्यांचे चांगलेच फावले जात आहे या वाढत्या चोऱ्या वा पाकीटमारी रोखण्या साठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते
संगमनेर बस स्थानकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने उभारलेल्या पोलीस चौकीचे तात्कालीन पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले होते
मात्र संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस संख्याबळ कमी असल्याच्या कारणामुळे त्या पोलीस चौकीत कोणीही पोलीस कर्मचारी थांबत नव्हते त्यामुळे साखळी चोर आणि पाकीटमार करणा ऱ्या चोरट्यांचे चांगलेच फावले जात होते
त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना बस स्थान कातील पोलीस चौकीच बनली शोभेचा बाहुला प्रकाशित करण्यात आले होते त्यानंतर अनेक दिवस लोटली गेली मात्र दिवसेंदिवस या बस स्थानकावर महिलांचे दागिने ओरबडण्या चे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतचहोते
त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते या अतीगंभीर बाबीची शहर पोलीस ठाण्याचे पो नि भगवान मथुरे यांनी त्याची दखल घेत बसस्थानकात महिला पोलीस कॉन्स्टेबल सोमेश्वरी शिंदे व पोलीस शिपाई अजित कुर्हे यांच्यासह महिला होमगार्ड सुनिता जंत्रे यांची बसस्थानकात कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय दिवसभरात दर तासाला साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांना पायबंद घालण्यास नक्कीच मदत होणार आहे
संगमनेर बसस्थानकामधील वाढत्या चोऱ्यांना पायबंद घालण्यासाठी कायम स्वरूपी दोन पोलीस कर्मचारी व होमगार्ड अशा तीन कर्मचार्यांची नेमणूक केली असून त्यांना कुठल्याही परीस्थितीत जागा न सोडण्याचे आदेश दिले आहेत.तसेच याशिवायसध्या वेशातील पोलिसांची नियमित गस्त ही सुरु करण्यात आली आहे
श्री भगवान मथुरे
संगमनेर शहर पोलीस निरीक्षक
संगमनेर शहरातील मेहेरमळा येथील बद्रीनारा यण लोहे यांची दोन तोळे वज नाची सोन साखळी, पिंपळगाव माथा येथील शांताबाई काशिनाथ सावंत रा. यांचे सोन्याचे हातकडे आणि नथ असे पाचतोळे वजनाचे दागिने कल्याण येथील येथील पंढरीनाथ लगड यांचेपाचतोळ्यांचे गंठण व दोन तोळ्यांची पोत असा 14 तोळ्यांचा मुद्देमाल सेवानिवृत्त मुख्याध्या पिका रजनी राहणे यांच्या पिशवीतील तब्बल साडेदहा तोळे सोन्याचे दागिने भर लेला डबा असे 15 लाख रुपये किमतीचे 25 तोळे सोन्याची चोरी संगमनेर बस स्थानक प्रवाशांना भितीदायक ठरुलागले होते
