गाडगेबाबांचे लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे = प्रा मुकुंद डांगे
पिंपरणेत विविध ठिकाणी संत गाडगे महाराजांना अभिवाद
पिंपरणे  / लोकवेध live न्यूज 
आधुनिक मराठी संत व समाजसुधारक स्वच्छतेचे उपासक व विज्ञानवादी संत गाडगेमहाराज त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘ गोधडे महाराज ’ किंवा  ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच ओळखत.समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती असे  त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे  असे प्रतिपादन प्राचार्य मुकुंद डांगे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त ते बोलत होते
कार्यक्रमाच्या वेळी प्रा मुकुंद डांगे यांच्या शुभहस्ते संत गाडगे बाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करण्यात आला तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गाडगे महाराजांच्या प्रतिमेस सरपंच नारायण मरभळ यांच्या शुभहस्ते हार अर्पण करण्यात आला ग्रामसेवक सुनील शेळके सह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आदी उपस्थित होते
तसेच जिल्हा परिषद प्राथ. केंद्र शाळा येथे  केंद्राचे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक संजय बोरसे यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी  मोदड मंदाकिनी,अस्वले सुनीता , दुर्गुडे प्रतिभा , गवारी मंदादेवी , बागुल प्रदीप, मुरडनर अनिता महिला शिक्षिका पालक वर्ग ग्रामस्थ महिला यावेळी उपस्थित होत्या
 मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख बोरसे म्हणाले की  संत गाडगे महाराजांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. ‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!