या गावात मिरचीच्या पिकात गांजाची शेती, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त  ! 

 

अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री

 

केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपूर या गावातील एका शेतकऱ्याने मिरचीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याची माहिती ए. एसपी पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यावरून छापा मारला असता गांजाची झाडे मिळून आली असून जवळपास सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचपूर गावात मिरचीच्या पिकात गांजाची शेती आहे अशी माहिती ए. एसपी पंकज कुमावत यांना मिळाली. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पथक सोबत घेऊन तारीख ७ बुधवार रोजी सायंकाळी छापा मारला असता यावेळी मिरचीच्या पिकात पाच ते सहा फुट उंचीचे डेरेदार असे गांजाची ९ झाडे मिळून आली. याचे वजन २४ किलो ८३० ग्रॅम व किंमत १ लाख २४ हजार हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या फिर्यादीवरून शेतकरी सत्यपाल ग्यानबा घुगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने केज व धारुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!